महापौर चषक स्पर्धेत ‘पिकलबॉल’ची सर्विस
By Admin | Updated: November 21, 2015 01:21 IST2015-11-21T01:21:13+5:302015-11-21T01:21:13+5:30
गेल्या काही वर्षांपासून मुंबईसह संपूर्ण देशात लोकप्रिय होत असलेला पिकलबॉल खेळ सरकारच्या साहाय्याने आपले स्थान आणखी भक्कम करण्यास सज्ज झाला आहे.

महापौर चषक स्पर्धेत ‘पिकलबॉल’ची सर्विस
रणधुमाळी : पक्ष लागले उमेदवारांच्या शोधात
कोरपना : निवडणूक म्हटली की पुढारी नेहमी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार राहून तसे धावपळ करताना दिसतात. नेमका तोच प्रत्यय घोषित झालेल्या कोरपना नगरपंचायतीच्या पहिल्या नगरपंचातीच्या निवडणुकीच्या निमित्ताने येऊ लागला आहे. वार्डनिहाय आरक्षण जाहीर झाल्याने पुढाऱ्यात लगीनघाई दिसून येत असून नगरसेवक पदाची स्वप्ने बाळगणाऱ्यांची राजकीय सेटींग सुरू झाली आहे.
लोकसंख्येने फुललेल्या कोरपना शहराचा विकास अक्षेपेप्रमाणे अद्यापही झाला नाही. रस्ते, पाणी, वीज, आरोग्यासारख्या मूलभूत गरजांसाठी कोरपनावासीयांना संघर्ष सुरू आहे. मात्र लोकसंख्या वाढीचा एका अर्थाने फायदाच झाला. ग्रामपंचायती ऐवजी आता नगरपंचायत झाल्याने विकासाच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत. प्रशासनाने प्रभागनिहाय आरक्षण जाहीर केले व तालुक्यातील राजकीय पुढाऱ्यात निवडणुकीची लगीनघाई सुरू झाली. कुठल्याही स्थितीत नगरसेवक व्हायचे हे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या काही पदाधिकाऱ्याचे स्वप्न आरक्षणामुळे अडचणीत सापडले आहे. त्यामुळे शहराच्या राजकीय गोटात आता ‘कही खुशी, कही गम’ अशी स्थिती आहे. आता लवकरच नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम लागणार असताना राजकीय पुढाऱ्यांनी निवडणुकाची तयारी सुरू केली आहे.
कोरपना येथील सर्वच प्रमुख पक्षांनी उत्तम संभाषण कौशल्य, तगडा जनसंपर्क, गर्दी खेचण्याची क्षमता असे निकर्ष लावूनच उमेदवारांची निवड करण्यावर नेतृत्वांचा भर आहे. (शहर प्रतिनिधी)
समस्या दुर्लक्षित
निवडणुकीसाठी उत्साहीत झालेल्या राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांना जनतेच्या व्यथांशी काही देणे घेणे नसावे, अशी स्थिती प्रत्यक्षात दिसून येत आहे. शहरातील नागरिक मूलभूत सुविधांअभावी त्रस्त झाले असून शासकीय कार्यालयात कुठलेही काम तत्परतेने होत नाही. त्यामुळे प्रशासनाविरुद्ध चिड आहे. तहसील कार्यालयात सामान्य नागरिकांसह विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी प्रचंड हेलपाटे खावे लागतात. शहरात पाणी प्रश्नही दिवसागणिक गंभीर होत असून बंद पडलेले पथदिवे, अस्वच्छतेने वेढलेल्या रस्ते याकडे कुणाचेही लक्ष दिसून येत नाही.