फिजिशियन गायब; रुग्ण उपचाराविना परतले
By Admin | Updated: February 9, 2015 23:10 IST2015-02-09T23:10:11+5:302015-02-09T23:10:11+5:30
अनेकांना सर्दी, खोकला ताप आदी आजाराने ग्रासले आहे. त्यामुळे नागरिकांत स्वाईन फ्लू आजाराची भिती पसरली आहे. त्यामुळे अनेक आजारग्रस्त रुग्ण आज जिल्हा सामान्य रुग्णालयात

फिजिशियन गायब; रुग्ण उपचाराविना परतले
चंद्रपूर : अनेकांना सर्दी, खोकला ताप आदी आजाराने ग्रासले आहे. त्यामुळे नागरिकांत स्वाईन फ्लू आजाराची भिती पसरली आहे. त्यामुळे अनेक आजारग्रस्त रुग्ण आज जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी गेले. मात्र, येथील फिजिशियन गायब असल्याने रुग्णांना तपासणीविनाच परतावे लागले. रुग्णालयाच्या या कारभाराप्रति नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सोमवारी सकाळी ११ ते १२ वाजताच्या सुमारास चंद्रपूर येथील सर्दी, खोकल्याने त्रस्त काही रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात औषधासाठी गेले. या रुग्णांनी ओपीडीतून चिठ्ठी काढली. त्यावेळी रुग्णांना फिजिशियनकडे भेटून तपासणी करुन घेण्याचे सांगण्यात आले. रुग्णांनी सामान्य रुग्णालयातील कक्ष क्रमांक १४ मध्ये फिजिशियन यांच्याकडे तपासणीसाठी गेले. मात्र, ते उपस्थित नव्हते. एक ते दीड तास प्रतीक्षा करुनही ते आले नाही. याबाबत चौकशी केली असता, येथे उपस्थित कंपाऊंडरने फिजिशियन रुग्णालयासमोरील झाडासमोर असतील, असे सांगितले. घडलेल्या या प्रकाराबाबत रुग्णांनी ‘लोकमत’ला भेट देऊन माहिती दिली.
जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे दोन रुग्ण आढळल्याने नागरिकांत भीती पसरली आहे. त्यातच आरोग्य विभाग मात्र आपण अलर्ट असल्याचे सांगत आहे. परंतु, आज घडलेल्या प्रकारावरुन रुग्णालयात स्वाईन फ्लू सारख्या आजारग्रस्ताची तपासणी खरच व्यवस्था आहे का, असा प्रश्न रुग्णांनी केला आहे. उपस्थित नसणारे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे फिजिशियन यांच्यावर कारवाई करण्याची मागणी रुग्णांनी केली. (स्थानिक प्रतिनिधी)