फुले, शाहू, आंबेडकर समितीच्या अध्यक्षपदी निशिकांत कांबळेे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:29 IST2021-04-04T04:29:08+5:302021-04-04T04:29:08+5:30

जिवती : तालुक्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे प्रचारक, कोरपना जिवती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ...

Phule, Shahu, Nishikant Kamble as the Chairman of the Ambedkar Committee | फुले, शाहू, आंबेडकर समितीच्या अध्यक्षपदी निशिकांत कांबळेे

फुले, शाहू, आंबेडकर समितीच्या अध्यक्षपदी निशिकांत कांबळेे

जिवती : तालुक्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे प्रचारक, कोरपना जिवती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निशिकांत सोनकांबळे यांची फुले, शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साठे समितीच्या अध्यक्षपदी, तर नभिलास भगत यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या वतीने त्या दोघांचा पण सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गोंगपा नेते तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पांडुरंग जाधव, गोंगपा महाराष्ट्र युवा मोर्चा कार्याध्यक्ष गजानन पाटील जुमनाके, महाराष्ट्र प्रवक्ता मेहबूब भाई शेख, युवा नेते भीमराव पाटील जुमनाके, माजी पंचायत समिती सभापती भीमराव मेश्राम, ज्येष्ठ नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ममता जाधव, बारीकराव कोटनाके, प्रा. लक्ष्मण मंगाम दिवाकर वेट्टी, चंदू कोटनाके, शिवाजी नैताम आदी उपस्थित होते.

Web Title: Phule, Shahu, Nishikant Kamble as the Chairman of the Ambedkar Committee