पेट्रोल पंपालगत स्कुटीने घेतला पेट

By Admin | Updated: May 16, 2016 01:00 IST2016-05-16T01:00:50+5:302016-05-16T01:00:50+5:30

शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या सावरकर पेट्रोल पंपाजवळ रविवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास एका स्कुटीने

Petrol pumps take a scuttle stomach | पेट्रोल पंपालगत स्कुटीने घेतला पेट

पेट्रोल पंपालगत स्कुटीने घेतला पेट

मूल येथील घटना : मोठा अनर्थ टळला
मूल : शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या सावरकर पेट्रोल पंपाजवळ रविवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास एका स्कुटीने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत स्कुटी जळून खाक झाली.
स्नेहा दामोधर निंबेकार (२२) ही युवती स्कुटी (एमएच ३४ झेड ७०३४) ने पेट्रोल भरण्यासाठी शहरातील मध्यवस्तीत असलेल्या सावरकर पेट्रोल पंपाजवळ आली. तेथे स्कुटी उभी करताच स्कुटीला आग लागली. आग लागल्याचे कळताच युवतीने स्कुटी तेथेच टाकुन पळ काढला. दरम्यान, जवळच असलेल्या एका युवकाच्या लक्षात ही बाब येताच त्याने जळणाऱ्या स्कुटीला बाहेर ओढत नेले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. जिल्ह्याचे तापमान ४६ अंशावर पोहोचले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Petrol pumps take a scuttle stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.