शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बंदुकीच्या धाकाने पेट्रोलपंपावर दरोडा; दोन लाखांची रोकड पळवली, राजुरा-वरूड रोडवरील घटना

By परिमल डोहणे | Updated: January 6, 2024 19:05 IST

सुरक्षारक्षकाकडून हिसकावली चावी

चंद्रपूर : पेट्रोलपंपावरील सुरक्षारक्षकाला बंदुकीचा धाक दाखवून त्याच्याकडून चावी हिसकावून एक लाख ९० हजार रुपये पळविल्याची घटना राजुरा वरुर रोडवरील साईकृपा पेट्रोलपंपावर घडली. या घटनेने शहरात दहशत पसरली आहे. पाचहीजण सीसीटीव्हीत कैद झाले असल्याची माहिती आहे.

राजुरा शहरापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर दिनबाग तांडा यांच्या मालकीचे साईकृपा पेट्रोलपंप आहे. ६ जानेवारीला रात्रीपासून सुरक्षारक्षक तैनात होता. दरम्यान, पहाटे ३ वाजताच्या सुमारास अज्ञात पाच व्यक्ती अचानक पंपावर आले. बंदुकीचा धाक दाखवून तेथील सुरक्षारक्षकाकडून चावी हिसकावली; तसेच पंपावरील विक्रीची एक लाख ९० हजार रुपयांची रक्कम घेऊन पसार झाले. पेट्रोलपंपावरील व्यवस्थापकाने पोलिस स्टेशनला माहिती दिली.

पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक साखरे, राजुरा येथील पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, विरूर स्टेशनचे पोलिस निरीक्षक निर्मल जयप्रकाश यांनी घटनास्थळाला भेट दिली. सीसीटीव्ही चेक केला. यावेळी २० ते २५ वर्षांच्या आतील पाच तोंडाला पट्टे बांधून, हातात शस्त्र घेऊन आढळून आले. पोलिसांनी संपूर्ण ठिकाणी नाकाबंदी केली. अज्ञाताविरुद्ध कलम ३९५, ३९८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :RobberyचोरीPoliceपोलिस