दुचाकी वाहनाद्वारे कीडनाशक फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 06:00 IST2019-11-25T06:00:00+5:302019-11-25T06:00:41+5:30

फवारणीचाखर्च झेपाण्यासारख्या नव्हता. त्यावर त्यांनीच उपाय शोधून काढला. दुचाकी वाहनावर दोन फवारणी करणारे पंप बांधले. त्याची चार्जिंग संपू नये म्हणून दोन सोलर प्लेट लावले. दोन पंपाकरिता आठ नोझल तयार केले. चार्जिंग पंप असल्यामुळे एकदा सुरू झाले की नोझल त्या माध्यमातून किटकनाशक औषधी पिकांवर आपोआप पडते.

Pesticide spraying by two-wheeler | दुचाकी वाहनाद्वारे कीडनाशक फवारणी

दुचाकी वाहनाद्वारे कीडनाशक फवारणी

ठळक मुद्देखर्चात बचत : शेकडो शेतकऱ्यांच्या भेटी

लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : शेती करताना दिवसागणिक मजूर मिळत नाही. मजूर मिळाले तर त्याचा दर शेतकऱ्यांना झेपत नाही. यावर मात करीत तालुक्यातील एका शेतकऱ्याने किटकनाशकाच्ांी फवारणी करण्याकरिता दुचाकीवर दोन पंप बांधले. त्यातून दुचाकी वाहनाने शेतात फवारणी करण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. दुचाकी वाहनाने एका दिवसातून २५ एकर शेतातील फवारणी केली जात आहे. मधुकर भलमे असे शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांना राज्य शासनाच्या वतीने शेतीनिष्ठ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
मधुकर भलमे यांची चारगाव बु. येथे आहे. पिकांना कीड लागल्याने ते अस्वस्थ होते. फवारणीचाखर्च झेपाण्यासारख्या नव्हता. त्यावर त्यांनीच उपाय शोधून काढला. दुचाकी वाहनावर दोन फवारणी करणारे पंप बांधले. त्याची चार्जिंग संपू नये म्हणून दोन सोलर प्लेट लावले. दोन पंपाकरिता आठ नोझल तयार केले. चार्जिंग पंप असल्यामुळे एकदा सुरू झाले की नोझल त्या माध्यमातून किटकनाशक औषधी पिकांवर आपोआप पडते. एका व्यक्तीजवळ किटकनाशक फवारणी पंप दिला तर व्यक्ती दिवसात दोन एकरमधील पिकांची फवारणी करतो . मात्र, दुचाकीने एका दिवसात तब्बल २५ एकर फवारणी शक्य झाली आहे. एक व्यक्ती दुचाकी चालवितो तर दुसरा व्यक्ती पाणी आणतो. दुचाकी वाहनाला दोन लिटर पेट्रोल लागते, अशी माहिती भलमे यांनी दिली. यामध्ये मजुरांच्या खर्चाची बचत होते. किटकनाशकाची फवारणी मोठ्या प्रमाणात होत असल्याने कामे लवकर आटोपतात. शेतीचा खर्च वाचविण्यासाठी सुरू केलेला मधुकर भलमे यांचा हा नाविण्य प्रयोग बघण्याकरिता परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीला भेट देत आहेत.

Web Title: Pesticide spraying by two-wheeler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती