कोरोना लस घेतल्यानंतर काही तासांत व्यक्तीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:33 IST2021-09-12T04:33:02+5:302021-09-12T04:33:02+5:30

श्याममूर्ती आदेलवार(वय ३५, रा. येरगव्हाण) असे मृतकाचे नाव आहे. याने सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास गावातीलच जि. प. शाळेतील केंद्रावर ...

A person dies within hours of being vaccinated against corona | कोरोना लस घेतल्यानंतर काही तासांत व्यक्तीचा मृत्यू

कोरोना लस घेतल्यानंतर काही तासांत व्यक्तीचा मृत्यू

श्याममूर्ती आदेलवार(वय ३५, रा. येरगव्हाण) असे मृतकाचे नाव आहे. याने सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास गावातीलच जि. प. शाळेतील केंद्रावर लस घेतली. तो घरी गेला. जेवण करून झोपला. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्याला झटके येऊ लागले. यानंतर त्याला देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथून त्याला राजुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यानंतर त्याला चंद्रपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. लस घेतल्याने आतापर्यंत जिल्ह्यात कुणाचाही मृत्यू झाला नाही. या व्यक्तीवर वेळीच योग्य उपचार झाले असते तर त्याचा जीव वाचला असता. याला आरोग्य यंत्रणेतील दोष कारणीभूत आहे. याची सखोल चौकशी करण्याची गरज आ. सुभाष धोटे यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: A person dies within hours of being vaccinated against corona