जिद्द, चिकाटी व धैर्य हाच यशाचा गुरूमंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:25 IST2021-03-24T04:25:42+5:302021-03-24T04:25:42+5:30

कोरपना : येथील प्रभाकरराव मामुलकर महाविद्यालयात प्राचार्य डॉ. टी. सी. जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली व आ. शि. प्र. मं. राजुरा ...

Perseverance, perseverance and patience is the guru mantra of success | जिद्द, चिकाटी व धैर्य हाच यशाचा गुरूमंत्र

जिद्द, चिकाटी व धैर्य हाच यशाचा गुरूमंत्र

कोरपना : येथील

प्रभाकरराव मामुलकर महाविद्यालयात प्राचार्य डॉ. टी. सी. जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली व आ. शि. प्र. मं. राजुरा संस्थेचे उपाध्यक्ष श्रीधरराव गोडे, सचिव अविनाश जाधव व सदस्य, साजीद बियाबानी यांच्या उपस्थितीत पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ पार पडला. या समारंभाचे प्रमुख अतिथी व मार्गदर्शक चिंतामणी कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एच. पठाण यांच्या हस्ते बी. ए. पदवी प्राप्त एकूण ५४ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. पठाण यांनी जिद्द, चिकाटी व धैर्य हाच यशाचा गुरूमंत्र आहे, असा यशाचा मूलमंत्र मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाचे संचालन अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. विशाल मालेकार यांनी केले. महाविद्यालयाचे नॅक समन्वय प्रा. राजू मेश्राम यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व किन्नाके, पुणेकर, कुमरे, आपटे यांनी सहकार्य केले.

Web Title: Perseverance, perseverance and patience is the guru mantra of success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.