शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

अगरबत्ती उत्पादनातून पोंभूर्ण्यातील ३०० महिलांना कायम रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 00:14 IST

‘पोंभूर्णा’ हे तालुक्याचे नाव. पूर्वी दुर्लक्षित गाव म्हणून ओळखले जायचे. गेल्या चार वर्षांत या तालुक्यात रोजगाराची क्रांतीच झाली. बांबू हॅन्डीक्राफ्ट अ‍ॅन्ड आर्ट युनिट, टुथपिक उत्पादन केंद्र, मधुमक्षिका पालन एक कृषी उद्योग, महिलांचा कुक्कुटपालन व्यवसाय करणारी पहिली सहकारी संस्था, .....

ठळक मुद्देचांदा ते बांदा योजनेतून बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचा नवा प्रकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ‘पोंभूर्णा’ हे तालुक्याचे नाव. पूर्वी दुर्लक्षित गाव म्हणून ओळखले जायचे. गेल्या चार वर्षांत या तालुक्यात रोजगाराची क्रांतीच झाली. बांबू हॅन्डीक्राफ्ट अ‍ॅन्ड आर्ट युनिट, टुथपिक उत्पादन केंद्र, मधुमक्षिका पालन एक कृषी उद्योग, महिलांचा कुक्कुटपालन व्यवसाय करणारी पहिली सहकारी संस्था, दुग्ध व्यवसाय प्रकल्प, एमआयडीसी स्थापनेची मंजुरी हे महत्त्वाचे प्रकल्प या लहानशा तालुक्यात रोजगाराचे नवे दालन उपलब्ध करून देत असताना आता अगरबत्ती उत्पादनातून तब्बल ३०० महिलांना प्रत्यक्ष रोजगार देणारा प्रकल्प सुरू झाला आहे.अगरबत्ती तयार करण्याच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय मान्यता असणाऱ्या आयटीसी या कंपनीच्या नामवंत ब्रँडच्या उत्पादनाला चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा या तालुक्याच्या ठिकाणावरून सुरुवात झाली आहे. चांदा ते बांदा या योजनेतून महाराष्ट्र बांबू विकास मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली, आयटीसी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहकार्याने हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.सहा महिन्यांपूर्वी राज्य शासन व आयटीसी यांच्यामध्ये यासंदर्भात सामंजस्य करार झाला होता. त्यानंतर या प्रकल्पाला गुरूवारी सायंकाळी पोंभुर्णा येथील किरण राईस मिलच्या आवारात आयोजित एका शानदार सोहळयाच्या माध्यमातून प्रत्यक्षात सुरुवात झाली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह आयटीसी लिमिटेड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी रायवरम स्वत: उपस्थित होते.५ कोटी ३४ लाख ९२ हजार अनुदान मंजूरमहाराष्ट्र बांबू विकास मंडळ, नागपूरच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाच्या चांदा ते बांदा योजनेंतर्गत पोंभूर्णा येथे हा अगरबत्ती प्रकल्प कार्यान्वित झाला. या प्रकल्पाला प्रथम टप्प्यात ४ कोटी ६२ लाख ६७ हजार रुपये मंजूर झाले. तर दुसऱ्या टप्प्यासाठी ७२ लाख २५ हजार रुपये अनुदान मंजूर झाले. या प्रकल्पासाठी कार्यान्वयन यंत्रणा बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली असून महिला आर्थिक विकास महामंडळ चंद्रपूरचे भरीव सहकार्य मिळाले आहे.या प्रकल्पामुळे पोंभूर्णा तालुक्याचे नाव भारतातल्या सर्व प्रमुख तीर्थक्षेत्रावर श्रद्धा आणि भक्तीने घेतले जाईल. ३०० महिलांना कायम रोजगार आणि आयटीसी या विख्यात कंपनीसोबत या परिसरातील गरीब आदिवासी जनतेचे कायमचे सख्य हे या कराराचे वैशिष्ट्य आहे- सुधीर मुनगंटीवार, वित्त, नियोजन व वने मंत्री ((म.रा.)तथा पालकमंत्री चंद्रपूर

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार