शालेय इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:19 IST2021-07-21T04:19:46+5:302021-07-21T04:19:46+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यातील काही शाळांच्या इमारती जीर्ण झाल्या असून, त्या धोकादायक आहे. त्यामुळे अपघात होण्यापूर्वी जिल्हा परिषद ...

शालेय इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करा
चंद्रपूर : जिल्ह्यातील काही शाळांच्या इमारती जीर्ण झाल्या असून, त्या धोकादायक आहे. त्यामुळे अपघात होण्यापूर्वी जिल्हा परिषद प्रशासनाने त्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक) जिल्हा शाखा-चंद्रपूरने केली आहे.
शालेय वर्गखोल्यांचे अपूर्ण बांधकाम पूर्ण करावे, संगणक संच दुरुस्ती करावी, नवीन संगणक संच द्यावे, विद्यार्थ्यांचे बॅंक खाते शून्य रकमेवर काढावे, प्राथमिक शिक्षकांचे वेतन १ तारखेला करावे, सी.एम.पी. प्रणाली लागू करावी, मासिक पगारातून होणारे कपाती विहीत मुदतीत जमा करावी, मोफत पाठ्यपुस्तके वाहतूक चौकशी करावी, सेवानिवृत्त व मृत शिक्षकांच्या कुटुंबीयांना लाभ विनाविलंब द्यावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
शिष्टमंडळात राज्य सहकार्यवाह प्रकाश चुनारकर, अध्यक्ष मोरेश्वर गौरकार, कार्यवाहन अमोल देठे, सुशांत मुनगंटीवार, सतीश दुवावार, दिनेश टिपले, नामदेव सुरपाम, उमेश गोखरे आदी उपस्थित होते.