नागभीड तालुक्याची पैसेवारी ५० टक्क्यांच्या आत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:13 IST2021-01-13T05:13:58+5:302021-01-13T05:13:58+5:30

नागभीड तालुक्यात महसुली व रिठी मिळून १३८ गावे आहेत. या गावात २७ हजार ८०७ हेक्टर क्षेत्र लागवडीखालील आहे. यापैकी ...

The percentage of Nagbhid taluka is within 50% | नागभीड तालुक्याची पैसेवारी ५० टक्क्यांच्या आत

नागभीड तालुक्याची पैसेवारी ५० टक्क्यांच्या आत

नागभीड तालुक्यात महसुली व रिठी मिळून १३८ गावे आहेत. या गावात २७ हजार ८०७ हेक्टर क्षेत्र लागवडीखालील आहे. यापैकी २७ हजार ६५८ हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्यात आली. बहुतेक क्षेत्रात धानाचीच पेरणी होती. या वर्षी या हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसाने आपला इंगा दाखविला. तालुक्याची पावसाची सरासरी १२५६ मिमी असून, संबंध हंगामात तो केवळ तो केवळ ४६५.८ मिमी एवढाच पडला. यावरही मात करत शेतकऱ्यांनी रोवणी आटोपली. मात्र, धान पीक अंतिम टप्प्यात आले असताना, या पिकावर विविध रोगांनी आक्रमण केले आणि शेतकऱ्यांचे स्वप्न पार धुळीस मिळविले. या पार्श्वभूमीवर या पिकाची महसूल विभागाकडून नुकतीच अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली. संबंध तालुक्याची पैसेवारी ५० टक्क्यांच्या आत असल्याने शेतकऱ्यांच्या शासनाकडून अपेक्षा वाढल्या आहे.

Web Title: The percentage of Nagbhid taluka is within 50%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.