आठवडाभरात समस्यांचा निपटारा न झाल्यास जनआंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:20 IST2021-07-18T04:20:40+5:302021-07-18T04:20:40+5:30

अरविंद रेवतकर मित्रमंडळाचे सदस्य, माजी सरपंच अरविंद रेवतकर यांच्या नेतृत्वात भिसी ग्रामपंचायतचे प्रभारी ग्रामसेवक संजय ठाकरे यांना भेटले. गावातील ...

People's movement if problems are not resolved within a week | आठवडाभरात समस्यांचा निपटारा न झाल्यास जनआंदोलन

आठवडाभरात समस्यांचा निपटारा न झाल्यास जनआंदोलन

अरविंद रेवतकर मित्रमंडळाचे सदस्य, माजी सरपंच अरविंद रेवतकर यांच्या नेतृत्वात भिसी ग्रामपंचायतचे प्रभारी ग्रामसेवक संजय ठाकरे यांना भेटले. गावातील मुख्य समस्या त्वरेने सोडविण्यासाठी ठाकरे यांच्याशी विस्ताराने चर्चा करून निवेदन दिले. भिसीवासीय जनतेला पिण्याचे पाणी नियमितपणे मिळावे, विविध वॉर्डातील पाण्याच्या टाकीचे विद्युत कनेक्शन खंडित झाल्यामुळे थकीत वीजबिल त्वरित भरावी. पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करावा. घरकूल बांधकाम लाभार्थ्यांना त्वरित अनुदान निधीचे हप्ते देण्यात यावेत. पावसामुळे पडझड झालेल्या घरांची यादी तयार करून गरजूंना त्वरित घरकूल देण्यात यावे. यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधले. यावेळी अहेमद शेख, ग्रा.पं. सदस्य मनोज गेडाम, विजय मेहर, निवृत्त प्राचार्य हनुमंत गेडाम, माजी ग्रा.पं. सदस्य विजय नन्नावरे, दीपक ठोंबरे, पंकज रेवतकर, श्रीकांत भिमटे, अमृत बन्सोड, मनोज दिघोरे, मोहन मुंगले आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: People's movement if problems are not resolved within a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.