संपर्कातील लोकांचीच चाचणी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 05:01 IST2020-07-26T05:00:00+5:302020-07-26T05:01:22+5:30
नमुने घेण्यासाठी शुक्रवारी कुचना वसाहतीत सामूदायिक भवन येथे शिबिर लावण्यात आले. मात्र तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या चुकीच्या नियोजनामुळे बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कुचना वसाहतीसमोरील प्रतिबंधित क्षेत्रातील आवश्यक लोकांचे स्वॅब न घेता माजरी-कुचना-पाटाळा-विसलोन परिसरातील लोकांना बोलावून ४२ लोकांचे स्वॅब घेण्यात आले. या दरम्यान प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांना स्वॅबकरिता माहितीसुद्धा देण्यात आली नाही.

संपर्कातील लोकांचीच चाचणी नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
माजरी : माजरी पोलीस ठाण्यांतर्गत कुचना वसाहतीच्या समोरील परिसरात असलेल्या एका ४३ वर्षीय चिकन विक्रेत्याचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान गुरुवारी त्या कुटुंबातील १५ वर्षीय मुलगाही पॉझिटिव्ह आढळून आला. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेणे आवश्यक होते. मात्र आरोग्य विभागाने याच व्यक्तींचे स्वॅब न घेतल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
कुचनाचे सरपंच यांनी बाधित व्यक्तीच्या संपर्कातील सर्वांना संस्थात्मक विलगीकरण करून त्या लोकांचे स्वॅबचे घेण्याची मागणी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय आसूटकर यांच्याकड़े केली होती. नमुने घेण्यासाठी शुक्रवारी कुचना वसाहतीत सामूदायिक भवन येथे शिबिर लावण्यात आले. मात्र तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या चुकीच्या नियोजनामुळे बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कुचना वसाहतीसमोरील प्रतिबंधित क्षेत्रातील आवश्यक लोकांचे स्वॅब न घेता माजरी-कुचना-पाटाळा-विसलोन परिसरातील लोकांना बोलावून ४२ लोकांचे स्वॅब घेण्यात आले. या दरम्यान प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांना स्वॅबकरिता माहितीसुद्धा देण्यात आली नाही. शिबिरात आलेल्या चमू सांयकाळी ५ वाजता शिबिर बंद करून निघून गेले.
प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांना स्वॅबकरिता कोणतीही सूचना देण्यात आली नाही. कोरोनाबाधित व्यक्ती आमच्या शेजारी असल्याने परिसर सील कंरण्यात आला. मात्र प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांचे स्वॅब घेणे गरजेचे होते. परंतु शिबिरातील कोणतेही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी आम्हाला स्वॅबकरिता बोलाविले नाही.
- अभय वानखेडे, माजी ग्रामपंचायत सदस्य, कुचना.