शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

दात कशाचे; सोन्याचे, चांदीचे की सिमेंटचे ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 15:41 IST

Chandrapur : मेटल, सिरॅमिक मेटल, झिरकॉनिया असे मटेरियल वापरून दात बसवण्याचे प्रमाण वाढले

चंद्रपूर : मागील काही वर्षामध्ये सोने आणि चांदीचे भाव प्रचंड वाढले आहे. पूर्वी सोने विशेषतः चांदीचे दात बसवित होते. मात्र यामध्येही पूर्ण सोने किंवा चांदी नसायची. आता कोणीही असे दात बसवित नाही. गेल्या काही वर्षांमध्ये मेटल, सिरॅमिक मेटल, झिरकॉनिया असे मटेरियल वापरून दात बसविले जातात. आता तर मूळ नैसर्गिक दाताचा रंग जसा असतो अगदी तसा दात बसवला जातो. त्यामुळे सोने, चांदी, सिमेंटच्या दातांच्या मागणीपेक्षा मेटल, सिरॅमिक मेटल, झिरकॉनियाचे दात अधिक बसविले जातात.

सोन्याच्या दातांचे प्रमाण घटले■ सोन्याचे दात लावण्याची काही वर्षांपूर्वी फॅशन होती. त्यामुळे काहीजण आर्वजून असे दात बसवत होते. मात्र आता मेटल, सिरॅमिक मेटल, झिरकॉनिया अशा मटेरियलमध्ये जसेच्या तसे दात बसवून मिळतात.■रुग्ण मेटल, सिरॅमिक मेटल, झिरकॉनिया दात बसविण्यालाच अधिक पसंती देतात. सोने, चांदीचे दात कुणीही बसवित नाही.

एका दाताचा खर्च किती■ दात बसविताना रुग्णांना कोणत्या मेटलमध्ये दात बसवायचा, हा विषय महत्त्वाचा आहे. साइज आणि रंगानुसार दातांचा खर्च येतो.■ विशेषतः मेटलचा दात तीन ते पाच हजार, सिरॅमिक चार ते आठ, झिरकॉनिया नऊ ते पंधरा हजार रुपयांपर्यंत दात बसवून मिळतात.■ हे दर कमीअधिकही असू शकतात.■ यामध्ये कोणत्या प्रकारचा दात बसवायचा, यानुसारही दर असते.

सिरॅमिक, झिरकॉनिया दातांची मागणीमागील काही वर्षांमध्ये दात बसविण्यासाठी विविध पद्धतींचा वापर केला जातो. यामध्ये मेटल, सिरॅमिक, झिरकॉनिया अशा सगळ्याच प्रकारच्या दातांनामागणी आहे. रुग्णांना ज्या पद्धतीने आणि आर्थिक खर्चानुसार दात लावायचा त्यानुसार डेण्टिस्ट रुग्णांना दात बसवून देतात.

शारीरिक सुदृद्धत्तेसाठी दातांची निगा राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दात किमान सकाळ आणि सायंकाळी ब्रशने स्वच्छ केले पाहिजे, जंक फूड, शीयपेय टाळले पाहिजे, वेळोवेळी दातांची तपासणी करावी. दातांची रचना चांगली, सरळ असावी यासाठी उपाययोजना करता येतात. सध्या सिरॅमिक, झिरकॉनिया हे दात लावणाऱ्याऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.-डॉ. श्रुती टोंगे दंतरोग, तज्ज्ञ, चंद्रपूर 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सchandrapur-acचंद्रपूर