कोरोनाग्रस्तांच्या मदतीला आनंदवनवासीय सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:22 IST2021-05-03T04:22:45+5:302021-05-03T04:22:45+5:30

फोटो : जिवती येथे रेशन किट पाठविताना आनंदवनाची चमू. वरोरा : कुठलीही संकटे आली तर आनंदवन महारोगी सेवा ...

The people of Anandvan rushed to the aid of the victims | कोरोनाग्रस्तांच्या मदतीला आनंदवनवासीय सरसावले

कोरोनाग्रस्तांच्या मदतीला आनंदवनवासीय सरसावले

फोटो : जिवती येथे रेशन किट पाठविताना आनंदवनाची चमू.

वरोरा : कुठलीही संकटे आली तर आनंदवन महारोगी सेवा समिती कुठलाही गाजावाजा करीत नाही व मदतीकरिता समोर राहते. सध्या कोरोना विषाणूचे संकट घोंगावत आहे. यामध्ये गरजूंना मदतीकरिता आनंदवन महारोगी सेवा समिती पुढे सरसावली आहे.

जिवती तालुक्यातील दुर्गम भागात दोनशे आदिवासी दिव्यांग आणि गरजू कुटुंबांना महिनाभऱ्याच्या रेशन किट नुकत्याच तहसीलदार प्रशांत बेडसे यांना सुपूर्द करण्यात आल्या. वरोरा शहरातील उपजिल्हा रुग्णालयाला पाच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन्स, पाच मोठे ऑक्सिजन सिलिंडर आणि औषधे देण्यात आली आहे. यापुढेही रुग्णांना आवश्यकतेनुसार औषधे दिली जाणार असल्याचे आनंदवनाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पोळ म्हणाले. शांतीवन प्रकल्प बीड येथे कोविड केअर सेंटर उभारण्यात येत असून त्याकरिता आनंदवनातून शंभर खाटा, शंभर गाद्या, चादरी आणि कापडी मास्क पाठविण्यात आले आहेत.

वरोरा तालुक्यातील दिव्यांग, निराधार आणि भूमिहीन कुटुंबाकरिता ३०० रेशन किट देण्यात येणार असून एकूण एक हजार रेशन किट वितरित करण्याचा संकल्प आनंदवनाने केला आहे. यासोबतच कोरोना बधितांवर उपचार केले जात असून त्यातून अनेक रुग्ण बरे झाले आहेत. आनंदवनातील शाळा आणि वसतिगृह कोरोना रुग्णांना विलगीकरणासाठी ठेवण्यात आलेले असून त्यांच्यावर डॉ. विजय पोळ हे उपचार करीत आहेत.

हे सर्व सेवा कार्य महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे यांच्या मार्गदर्शनात कौस्तुभ आणि पल्लवी आमटे, कपिल कदम, सीतारतन रुग्णालयाची चमू, अतुल मांडवगणे, राजेश ताजने, शौकत खान, रवींद्र नलगटीवार, साबिया खान करीत आहेत.

Web Title: The people of Anandvan rushed to the aid of the victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.