पल्लेझरीत आरोग्य शिबिर

By Admin | Updated: August 27, 2016 00:38 IST2016-08-27T00:38:49+5:302016-08-27T00:38:49+5:30

आपले आरोग्य सुरक्षित राखायचे असल्यास प्रत्येकाने स्वच्छता राखण्याच्या सवयी अंगिकारण्याची गरज आहे.

Pelesar Health Camp | पल्लेझरीत आरोग्य शिबिर

पल्लेझरीत आरोग्य शिबिर

संध्या गुरुनुले : सुरक्षित आरोग्यासाठी स्वच्छतेची कास धरा
जिवती : आपले आरोग्य सुरक्षित राखायचे असल्यास प्रत्येकाने स्वच्छता राखण्याच्या सवयी अंगिकारण्याची गरज आहे. त्याकरिता सुरक्षित आरोग्यासाठी स्वच्छतेची कास धरावी, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरुनुले यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या वतीने जिवती तालुक्यातील पल्लेझरी येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले. या आरोग्य शिबिरात प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) रवींद्र मोहिते, जिल्हा परिषद सदस्य पंकज पवार, पंचायत समिती सदस्य महेश देवकाते, शेख फलिम शेख उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्षा गुरुनुले पुढे म्हणाल्या की, शौचालयचा नियमित वापर करावा. आपला परिसर स्वच्छ, सुंदर करा. आरोग्यदायी वातावरणासाठी शौचालयाचे बांधकाम पूर्ण करून नियमित वापर करा. स्वच्छतेच्या कार्यात जिवती तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी स्वत:हून सहभागी होऊन गावागावांत स्वच्छतेची चळवळ निर्माण करावी, असेही आवाहन त्यांनी केले. सभेत गुरुनुले यांनी मरईपाटण व शेणगावसाठी आरो पद्धतीचे दोन जलशुद्धीकरण सयंत्र मंजूर केल्याची घोषणा केली.
प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्रीराम गोगुलवार यांनी केले. कार्याक्रमाला जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक मुळावार, स्वच्छ भारत मिशनचे कृष्णकांत खानझोडे, बंडू हिरवे, जिवती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बगडे आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)

स्टॉलला भेटी आणि रुग्णांची तपासणी
कार्यक्रम प्रसंगी विविभ विभागांचे स्टाल लावण्यात आले होते. या स्टॉलला प्रमुख अतिथींनी भेट देऊन पाहणी केली. या शिबिरासाठी विविध रोगांचे स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहून मोठ्या प्रमाणावर या परिसराती, शिबिरात आलेल्या रुग्णांची तपासणी करून योग्य उपचार करण्यात आले.

Web Title: Pelesar Health Camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.