वीज ग्राहकांकडून ५० कोटींचा भरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:56 IST2020-12-04T04:56:44+5:302020-12-04T04:56:44+5:30
चंद्रपूर : महावितरणकडून दिवाळीनंतर थकबाकीदार वीज ग्राहकांना थकीत वीज देयकाचा भरणा करण्यासाठी मोहीम राबिवण्यातआली. चंद्रपूर मंडळ कायार्लय अंतर्गत ...

वीज ग्राहकांकडून ५० कोटींचा भरणा
चंद्रपूर : महावितरणकडून दिवाळीनंतर थकबाकीदार वीज ग्राहकांना थकीत वीज देयकाचा भरणा करण्यासाठी मोहीम राबिवण्यातआली. चंद्रपूर मंडळ कायार्लय अंतर्गत वीज ग्राहकांकडून. नोव्हेंबर-२०२० मध्ये सुमारे ५० कोटी रुपयांचा भरणा करण्यात आल्याची माहिती मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी दिली.
लॉक डाऊनच्या काळात महावितरणकडून मीटर वाचन आणि वीज देयकाचे वितरण बंद करण्यात आले होते. जून महिन्यापासून मीटर वाचन आणि वीज देयकाचे वाटप सुरु करण्यात आले. वीज ग्राहकांना ३-४ महिन्याचे देयक एकदम आल्याने महावितरणकडून वीज ग्राहकांना हप्त्याने वीज देयक भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. वीज ग्राहकांना मोठ्या रकमेचे देयक आल्याने त्यांच्या मनातील शंकाचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक उपविभागात तक्रार निवारण मेळावे, वेबिनार घेण्यात आले. याला वीज ग्राहकांकडून व्यापक प्रतिसाद मिळाला .
चंद्रपूर विभागातील चंद्रपूर शहर उपविभाग, मूल व सावली उपविभागातील ८९,५३५ वीज ग्राहकांनी १७ कोटी ६८ लाख रुपयांचा भरणा या कालावधीत केला. बल्लारशा विभागात येणाऱ्या बल्लारशा, गडचांदूर,गोंडपिंपरी, जिवती, पोंभूर्णा आणि राजुरा उपविभागातील ४६,५६८ वीज ग्राहकांनी ७ कोटी ७९ लाख रुपयांचा भरणा केला. भद्रावती, चिमूर आणि वरोरा उपविभागातील ५७,४९१ वीज ग्राहकांनी ७ कोटी ९६ लाख रुपयांचा भरणा केला. ब्रम्हपुरी विभागातील ४७,२८० वीज ग्राहकांनी ५ कोटी ३४ लाख रुपयांचा भरणा केला. गडचिरोली विभागातील ६० हजार ६५१ वीज ग्राहकांनी ७ कोटी १३ लाख रुपयांचा भरणा केला.
नोव्हेंबर-२०२० मध्ये एकूण ३ लोक ३४ हजार वीज ग्राहकांपैकी चंद्रपूर जिल्ह्यात ६६ हजार ४३२ वीज ग्राहकांनी तर गडचिरोली जिल्ह्यातील ४७ हजार १८८ वीज ग्राहकांनी ऑनलाईन पद्धतीने वीज देयकाचा भरणा केला आहे. चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता देशपांडे हे उपविभाग व शाखा कार्यालयात जाऊन वीज ग्राहकांशी संवाद साधून मेळावे घेऊन, लोक प्रतिनिधींसोबत संवाद साधत आहेत.