हातपंप दुरूस्तीकडे लक्ष द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:28 IST2021-03-18T04:28:03+5:302021-03-18T04:28:03+5:30
रस्त्यांचे काम गतीने करावी चंद्रपूर : जिल्ह्यात विविध ठिकाणी रस्त्यांच्या बांधकाम सुरू आहे.आता पावसाळा सुरू झाल्यामुळे त्रास होण्याची शक्यता ...

हातपंप दुरूस्तीकडे लक्ष द्यावे
रस्त्यांचे काम गतीने करावी
चंद्रपूर : जिल्ह्यात विविध ठिकाणी रस्त्यांच्या बांधकाम सुरू आहे.आता पावसाळा सुरू झाल्यामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्याचे कामे गतीने करण्याची मागणी केली जात आहे.
प्रवासी निवाऱ्यांची दुरुस्ती करावी
कोरपना: राजुरा, कोरपना तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या काही गावातील प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे, अनेक निवाऱ्यांना शेडसुद्धा नाही. सध्या उन्हाचे दिवस असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे निवाऱ्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.
मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा
घुग्घुस : येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे उभी राहत असल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, रात्रीच्या सुमारास घराबाहेर निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देवून या जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
जीवघेण्या फांद्या तोडण्याची मागणी
चंद्रपूर : जिल्ह्यातील काही रस्त्यांवरील झाडांच्या फांद्या जीवघेण्या ठरत आहे. त्यामुळे या फांद्याची छाटणी करावी, अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात आली. विशेष म्हणजे, येथील कस्तुरबा मार्गावरील आझाद बाग परिसरात झाडांच्या फांद्यामुळे वाहनधारकांना सिग्नलसुद्धा दिसत नाही.
ग्रामीण भागात शौचालयाचा वापर नाही
गोंडपिपरी : स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये शासनाने वैयक्तिक शौचालय बांधून दिले आहे. असे असतानाही आजही काही नागरिक शौचालयाचा वापर न करताच बाहेर जात असल्याने ग्रामीण भागातील स्वच्छतेचे तिनतेरा वाजले आहे. विशेषत: पोंभुर्णा, मूल, सिंदेवाही, सावली, राजुरा तालुक्यातील अनेक गावांत अस्वच्छता बघायला मिळत आहे.
निराधार नागरिकांचे अनुदान रखडले
नागभीड : मागील काही महिन्यांपासून श्रावण बाळ योजनेचे अनुदान थकल्याने लाभार्थ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. अनेक. लाभार्थी प्रशासकीय कार्यालयात तसेच बँकेत चकरा मारीत आहेत. मात्र पैसे आले नसल्याने त्यांना परत जावे लागत आहे. त्यामुळे अनुदान जमा करावे, अशी मागणी लाभार्थ्यांकडून केली जात आहे.
धुर फवारणी मारण्याची मागणी
चंद्रपूर : शहरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी शहरात जागृती केली जात आहे. शहरातील सर्वच प्रभागात आरोग्य जागृतीला वेग आला आहे. महापालिका प्रशासनाने मच्छरांचा बंदोबस्तासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी केली जात असून प्रत्येक वॉर्डात धुर फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पांदन रस्त्याचे कामे मशीनद्वारे करावे
चंद्रपूर : रोजगार हमी योजनेची कामे मजुरांद्वारे केली जाते.मात्र मजुरी कमी मिळत असल्याने मजुर या कामावर जाण्याचे टाळत आहे. परिणामी अनेक गावातील पांदन रस्त्याचे कामे रखडले आहे. त्यामुळे या रस्त्यांची कामे मंजुरांकडून न करता विविध मशनरींजच्या सहाय्याने करावे. अशी मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे, ज्यांच्याकडे जॉबकार्ड आहे त्यांनाच कामे देता येत असल्याने अन्य मजुर यापासून वंचित आहे.
पतसंस्था आल्या अडचणीच
चंद्रपूर : कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेता आहे. त्यामुळे घेतलेले कर्ज तसेच अन्य ठेवी भरण्यासाठी सामान्य नागरिकांकडे पैसाच नसल्याने पतसंस्थाही अडचणीत आल्या आहेत. जिल्ह्यात मोठ्या संख्येने पतसंस्था आहे. मात्र काही बोटावर मोजण्याइतक्याच संस्था सुस्थितीत असून अन्य पतसंस्था मात्र सध्यातरी आर्थिक अडचणीत आल्या आहे.
जडवाहतुकीवर आळा घालण्याची मागणी
चंद्रपूर : क्षमता कमी असतानाही जास्त वजन असलेल्या वाहनांद्वारे साहित्य आणण्यात येत असल्याने रस्त्याची दुरवस्था पदू आहे. परिणामी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरी वसाहतीमध्ये जडवाहतुकीला आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली आहे.