चंद्रपूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेंतर्गत जिल्ह्यात १४ दवाखाने कार्यरत आहेत. या दवाखान्यांची गोरगरीब रुग्णांना मदत होत आहे. सन २०२४-२५ मध्ये या दवाखान्यातून शेकडो रुग्णांवर उपचार झाले. गरजू रुग्णांची मोफत प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली आहे. चंद्रपूर शहरात तसेच तालुकास्तरावर प्रत्येकी एक दवाखाना आहे.
शहरी भागातील अतिशय दाटीवाटीने बसलेल्या भागापासून तसेच झोपडपट्टी वस्तीपासून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अंतर जास्त असते. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामकाजाच्या अयोग्य वेळेमुळे काही झोपडपट्ट्या व झोपडपट्टीसदृश भाग आरोग्यसेवांपासून वंचित राहत होते. तसेच राज्यातील दवाखाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने स्मार्ट बनवण्यासाठी, सातत्यपूर्ण, आरोग्य गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान करण्यासाठी, विविध रोगांच्या प्रादुर्भावाचे निरीक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी व सुलभआणि परवडणारी आरोग्यसेवा प्रदान करून संपूर्ण समाजाचा सहभाग वाढविण्याकरिता 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हा उपक्रम सुरी करण्यात आला. या माध्यमातून शहरी भागातील जनसामान्य, गोरगरीब, झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी व गरजू रुग्णांना सेवा देण्याचा राज्य शासनाचा मानस आहे.
या कालावधीत सेवाबाह्यरुग्ण सेवा (वेळ दुपारी २ ते रात्री १०), मोफत औषधोपचार, मोफत आरोग्य तपासणी, टेली कन्सल्टेशन-गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण, बाह्य यंत्रणेद्वारे रक्त तपासणीची सोय उपलब्ध असते.
मोफत सेवाआपला दवाखानामध्ये उपचार पूर्णपणे मोफत आहेत. तसेच मोफत औषधे पुरविल्या जाते. मोफत सल्ला, उपचार आणि निदान देखील होते. यामुळे रूग्णांना योग्य प्राथमिक वैद्यकीय मदत मिळण्याचा आर्थिक भार कमी होतो.