नागभीड सखी मंचतर्फे सहल
By Admin | Updated: December 20, 2015 00:49 IST2015-12-20T00:49:37+5:302015-12-20T00:49:37+5:30
लोकमत सखी मंच नागभीडतर्फे आनंदवन वरोरा येथे एक दिवसीय सहलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

नागभीड सखी मंचतर्फे सहल
नागभीड : लोकमत सखी मंच नागभीडतर्फे आनंदवन वरोरा येथे एक दिवसीय सहलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
आनंदवन वरोरा आणि आजूबाजूच्या परिसर बघण्यास ३० सखींनी सहभाग दर्शविला. नागभीड ते वरोरा या प्रवासामध्ये जेवढे प्रेक्षणीय स्थळ बघता येतील. तेवढे बघण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये सर्वात प्रथम स्थळ चिमूरचे तिरुपती बालाजी देवस्थान, त्यानंतर भटाळा येथे आकाराने पाच फूट उंच असलेले शिवलिंग तसेच पुरातन गणेश मंदिर पाहण्यात आले. त्यानंतर आनंदवन येथे भेट देण्यात आली. सर्वप्रथम सखींनी सामूहिक भोजन केले. त्यानंतर बाबा आमटे आणि साधनाताई यांच्या समाधीला वंदन केले.
बाबाच्या आनंदवनात प्रेमातून, स्नेहातून हजारो हात निर्मित अनेक वस्तू पाहून त्यांची कला जाणून घेतली. फळा- फुलांची शेती करणे, चरख्यावर सुत काढून दऱ्या, चटया, कपडा विणणे, बांधकाम करणे, केळीच्या झाडाची साल व तणस यापासून हस्तकला, ग्रिटिंग बनविणे, लाकडापासून खुर्ची टेबल बनविणे. सुंदर कलाकृती बनविणे याबाबत जाणून घेतले. अंध आणि अपंगांचा स्वरानंदवन हा आॅर्केस्ट्रा पाहणाचा आनंद सखींनी घेतला.
एकंदरीत आनंदवन येथील निसर्ग सानिध्यात असलेले वातावरण, येथील सर्वधर्म समभाव, बाबांचे- साधनाताईचे वात्सल्य व रुग्णांची आपसातील सहानुभूती या वसाहतीचे भूषण आहे, असे मत सखींनी व्यक्त केले. (तालुका प्रतिनिधी)