गडचांदूर येथे प्रवासी रेल्वेला प्रशासनाचा विरोध

By Admin | Updated: May 13, 2017 00:40 IST2017-05-13T00:40:16+5:302017-05-13T00:40:16+5:30

औद्योगिक शहर गडचांदूरपर्यंत रेल्वेलाईन असून विद्युतीकरणसुद्धा झाले आहे. या रेल्वेलाईन वरुन केवळ माल वाहतूक होते.

Passenger Railways in Gadchandur opposes the administration | गडचांदूर येथे प्रवासी रेल्वेला प्रशासनाचा विरोध

गडचांदूर येथे प्रवासी रेल्वेला प्रशासनाचा विरोध

औद्योगिक गाव : अनेक वर्षांपासून प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचांदूर : औद्योगिक शहर गडचांदूरपर्यंत रेल्वेलाईन असून विद्युतीकरणसुद्धा झाले आहे. या रेल्वेलाईन वरुन केवळ माल वाहतूक होते. माणिकगड, अल्ट्राटेक, अंबुजा सिमेंट कंपनीपर्यंत रेल्वे वाहतूक सुरुअ ाहे. गडचांदूर रेल्वेस टेशन येथून प्रवाशी रेल्वे सुरू करण्याची मागणी कित्येक वर्षापासून करण्यात येत आहे.
सामाजिक कार्यकर्ते रमेश काकडे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत आहे. रेल्वेमंत्री मुख्यमंत्री, खासदार, आमदार यांना पत्रद्वारे केला आहे.
केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लक्ष देऊन गडचांदूर येथून बल्लारशाह, नागपूर व गोंदियापर्यंत प्रवाशी रेल्वे सुरु करावी, अशी प्रवाशांची मागणी आहे. गडचांदूर औद्योगिक क्षेत्रात मुंबई, हैदराबाद, दिल्ली, पाटणा येथील नागरिक मोठ्या संख्येत आहे. त्यांना बल्लारशाह येथून रेल्वे शने जावे लागते. गडचांदूर येथून रेल्वे सुरु केल्यास फायदेशीर ठरु शकते.

केंद्रीय मंत्री सुरू करू शकतात प्रवासी रेल्वे
दक्षिणपूर्व मध्य रेल्वे बिलासपूरचे उपमुख्य परिचालक प्रबंधनांनी एका पत्राद्वारे कळविले आहे की, गडचांदूर रेल्वे स्टेशन दक्षिण मध्ये रेल्वे क्षेत्रात येते तसेच चांदाफोर्ट ते गडचांदूरपर्यंत थेट रेल्वेलाईन उपलब्ध नाही. त्यामुळे गोंदिया-चांदाफोर्ट पॅसेंजर गडचांदूरपर्यंत आणणे शक्य नाही. रेल्वे प्रशासनाचे हे उत्तर संयुक्तिक वाटत नाही. गडचांदूर येथून भारतात कानाकोपऱ्यात सिमेंट, कोळसा रेल्वेद्वारे जात आहे. तेव्हा थेट रेल्वे कशाला हवी? गडचांदूर दक्षिण मध्य रेल्वेमध्ये येते आणि बल्लारपूर दक्षिणपूर्व मध्य रेल्वेत येते. तेव्हा त्यावर तोडगा काढून गडचांदूरपर्यंत रेल्वे आणू शकते. केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जातीने लक्ष दिल्यास हा प्रश्न सुटू शकतो. त्यातून गडचांदूर येथून प्रवासी रेल्वे सुरु होऊ शकते.

Web Title: Passenger Railways in Gadchandur opposes the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.