दुभाजक सील केल्याने प्रवाशांची अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:19 IST2021-07-21T04:19:59+5:302021-07-21T04:19:59+5:30
काही वर्षांपूर्वी सा.बां. विभागाकडून या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले होते. यावेळी काही ठिकाणी वर्दळ लक्षात घेऊन हे दुभाजक मोकळे ...

दुभाजक सील केल्याने प्रवाशांची अडचण
काही वर्षांपूर्वी सा.बां. विभागाकडून या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले होते. यावेळी काही ठिकाणी वर्दळ लक्षात घेऊन हे दुभाजक मोकळे ठेवण्यात आले होते. यात प्रामुख्याने जनता कन्या शाळा, पेट्रोल पंप या मुख्य ठिकाणांचा समावेश होता. येथूनच प्रवाशांचे जाणे- येणे सुरू होते. मात्र, सोमवारी हे दुभाजक अचानक सील करण्यात आले. हे दुभाजक सील करण्यात आल्याने आता प्रवाशांचा त्रास वाढला आहे. हे सील त्वरित हटवावे, अशी मागणी होत आहे. आता ये-जा करणाऱ्यांना फेरा मारून ईप्सित स्थळी यावे लागणार आहे. उल्लेखनीय बाब अशी की, धातूने बनविलेले हे सील अतिशय तकलादू आहेत. एखाद्या वाहनाने छोटासा धक्का दिला तरी ते तुटू शकते.
200721\img-20210720-wa0019.jpg
अशाप्रकारे दुभाजक सील करण्यात आले