शिक्षकांच्या प्रांतीय अधिवेशनात अनेक ठराव पारित
By Admin | Updated: March 1, 2016 00:43 IST2016-03-01T00:43:27+5:302016-03-01T00:43:27+5:30
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय अधिवेशन स्थानिक विद्यानिकेतन माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात पार पडले.

शिक्षकांच्या प्रांतीय अधिवेशनात अनेक ठराव पारित
चंद्रपूर : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय अधिवेशन स्थानिक विद्यानिकेतन माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात पार पडले. विदर्भभरातून आलेल्या मोठ्या प्रमाणातील शिक्षकांच्या सहभागामुळे, हे अधिवेशन लक्षवेधी ठरले आहे. शिक्षकांच्या मुळ प्रश्नाला हात घातल्यामुळे आणि वेळोवेळी अमरावती, नागपूर उपसंचालकाच्या कार्यालयातून जिल्हास्तरावरील शिक्षणाधिकारी कार्यालयापर्यंत झालेल्या आंदोलनामुळे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या प्रांतीय अधिवेशनाला मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या प्रतिसाद मिळाला.
या प्रांतीय अधिवेशनाचे उद्घाटन माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार तथा म.रा. माध्यमिक शिक्षक महामंडळ मुंबईचे अध्यक्ष व्ही.यू. डायगव्हाणे तर प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. मोरेश्वर टेमुर्डे, प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे, प्राचार्य डॉ. शरयु तायवाडे, प्राचार्य नितीन जुनोनकर, संध्या इंगळे, दत्तात्रय मिर्झापुरे, जगदीश जुनगरी हे होते. वि.मा.शि. संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले, अध्यक्ष श्रावण बरडे, जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे उपस्थित होते. याप्रसंगी माजी खासदार नरेश पुगलिया यांनी मार्गदर्शन केले.
प्रांतीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शिक्षक-विद्यार्थी हितविरोधी शासन धोरण, घातक, शासन निर्णयाबाबत संघटनेची भूमिका या विषयावर विविध मान्यवरांचे चिंतनपर व्याख्यान झाले. या चर्चासत्रामधून शासनाचे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याबद्दलचे उदासीन धोरण स्पष्ट झाले.
तसेच विदर्भ माध्यमिक शिक्षक. संघाची आमसभासुद्धा या अधिवेशनादरम्यान पार पडली. सन २००८ ते २०१६ पर्यंतच्या अहवाल सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी सभेत सादर केले व विषयानुरुप सभेत सविस्तर चर्चा करून सर्वानुमते सर्व ठराव पारित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांतीय अध्यक्ष श्रावण बरडे तर पहिल्या सत्राचे उद्घाटक माजी आमदार व्ही.यू. डायगव्हाणे हे होते. संचालन सुनील शेरकी तर आभार दिगांबर कुरेकार यांनी मानले.
प्रास्ताविक सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी केले. प्रमुख पाहुणे अॅड. मोरेश्वर टेमुर्डे, प्राचार्य बबनराव तायवाडे, डॉ. शरयू तायवाडे, प्रा. नितीन जुनोनकर, दत्तात्रय मिर्झापुरे, संध्या इंगले, जगदिश जुनगरी यांचेही या निमित्ताने मार्गदर्शन झाले.
संचालन श्रीहरी शेंडे यांनी तर आभार श्रावण बरडे यांनी मानले. अधिवेशन यशस्वी करण्याकरिता प्रांतीय पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी व सर्व तालुक्याचे पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले अशी माहिती संघटेनचे पदाधिकारी प्रभाकर पारखी यांनी दिली. (प्रतिनिधी)