पैनगंगा नदीतील तो भाग ठरतोय सेल्फी पॉइंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:15 IST2020-12-28T04:15:16+5:302020-12-28T04:15:16+5:30
अन अनेकांना आकर्षण : नयनरम्य व निसर्ग पूर्ण दृश्य जयंत जेनेकर फोटो कोरपना : चंद्रपूर - यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरून ...

पैनगंगा नदीतील तो भाग ठरतोय सेल्फी पॉइंट
अन
अनेकांना आकर्षण : नयनरम्य व निसर्ग पूर्ण दृश्य
जयंत जेनेकर
फोटो
कोरपना : चंद्रपूर - यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या, पैनगंगा नदीवरील पारडी घाटावर नदी मधोमध असलेल्या दगडांच्या शृंखला आकर्षणाच्या केंद्रबिंदू ठरत आहे. त्यामुळे अलिकडे हा भाग सेल्फी पॉइंट म्हणून उदयास आला आहे.
पारडीवरून खातेरा गावाकडे नदी मार्गाने पायदळ जात असताना हे स्थळ आहे. अलिकडेच याच दगडी शृंखलेच्या बाजूला भव्य पूलांची निर्मिती होत आहे. त्यामुळे पूलाची निर्मिती झाल्यावर वरूनच किंवा खाली उतरून या स्थळी जावे लागणार आहे. मात्र
येथून मार्गक्रमण करताना भल्याभल्यांना सेल्फीचा मोह आवरत नाही. तसेच युवावर्ग मॉडेलिंग फोटो, प्री रिंग सेरेमनी, वेडिंग शूटिंगसाठीही या स्थानाला अधिक पसंती देताना दिसतात. शनिवार व रविवारला तर अनेक हौशी मंडळी केवळ विविध छटेतील फोटोज काढण्यासाठी येतात. त्यामुळे या स्थळी जणू सेल्फीकरांची जत्राच दिसून येते. नदीघाट असल्याने येथील प्राकृतिक व नैसर्गिक सौंदर्य अधिकच खुलून दिसते. त्यामुळे परिसरातील गावातील मंडळी मॉर्निंग वॉकसाठीही प्रभात काळी येथेच येण्याचा कल दिसून येतो.