वरोऱ्यातील खासगी सोनोग्रॉफी सेंटर मालामाल

By Admin | Updated: May 14, 2016 00:49 IST2016-05-14T00:49:00+5:302016-05-14T00:49:00+5:30

येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये लाखो रुपये खर्च करून शासनाने ‘सोनोलाजिस्ट’ ही सोनोग्रॉफी मशीन खरेदी केली. मात्र ही मशीन सतत बंद असते.

Parrot Private Sonography Center Malalmal | वरोऱ्यातील खासगी सोनोग्रॉफी सेंटर मालामाल

वरोऱ्यातील खासगी सोनोग्रॉफी सेंटर मालामाल

गरीब रूग्णांची आर्थिक लूट : उपचार न करताच खासगी रुग्णालयात केले जाते रेफर
वरोरा : येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये लाखो रुपये खर्च करून शासनाने ‘सोनोलाजिस्ट’ ही सोनोग्रॉफी मशीन खरेदी केली. मात्र ही मशीन सतत बंद असते. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील महिलांना खासगी सोनोग्राफी सेंटरमध्ये जाण्यासाठी सहीनिशी व ‘त्या’ दवाखान्याच्या चिठ्ठीवर नमूद करून पाठविले जाते. यातून शहरी व ग्रामीण भागातील रुग्णांची मोठ्या प्रमाणात लूट होत असून सोनोग्राफी सेंटरचे मालक मात्र मालामाल होत आहेत.
वरोरा उपजिल्हा रुग्णालयात राज्य शासनाने अनेक महागड्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यासाठी लाखो रुपये खर्च करून सोनोग्राफी मशीन उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे या रुग्णालयात तालुक्यातील गर्भवती महिला उपचारासाठी येतात. महिलांची सोनोग्राफी करणे अनिवार्य असते. परंतु रुग्णालयात सोनोलॉजिस्ट तज्ञ नसल्याने उपजिल्हा रुग्णालयातील काही वैद्यकीय अधिकारी त्यांना खासगी रुग्णालायतील सोनोग्राफी सेंटरला जा, असे सांगत त्या रूग्णालयाची चिठ्ठी लिहून देत आहेत. हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असून ग्रामीण रूग्णांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे.
येथील रुग्णालयात येणारे रूग्ण हे ग्रामीण भागातील व गरीब असून त्यांना खासगी सोनोग्राफी सेंटरवर तपासणी करणे परवडणारे नाही. मात्र तरीही नाईलाजास्तव खासगी रूग्णालयाची वाट धरावी लागत आहे. ही बाब गंभीर असून या ठिकाणी नियमीत सोनोलॉजिस्टची गरज असून रूग्णालयात होणारी रुग्णांची हेळसांड व आर्थिक लूट थांबवावी, अशी मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)

वैद्यकीय अधिकारीच देताच खासगी रूग्णालयाची चिठ्ठी
दर बुधवारी गर्भवती महिलांची तपासणी करीत असताना काही वैद्यकीय अधिकारी हे आपल्या टेबलवर रुग्णालय किंवा खासगी दवाखान्याचे लेटरपॅड ठेवून बसतात. त्यानंतर तपासणीसाठी आलेल्या महिलेला ‘तुम्हाला सोनोग्राफी खासगी रुग्णालयातच करावी लागेल’ असे सांगत असतात. तर गोपनीय माहितीनुसार येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘त्या’ खासगी सोनोग्राफी सेंटर चालकांकडून आर्थिक लाभ मिळत असल्याची माहिती आहे.

Web Title: Parrot Private Sonography Center Malalmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.