परमानंद तिराणिक महाराष्ट्र प्राईड ऑफ इंडिया अवाॅर्डने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:36 IST2021-02-27T04:36:37+5:302021-02-27T04:36:37+5:30

विविध क्षेत्रांतील समाजाच्या उन्नतीसाठी व त्यांचे जीवनमान उंचविण्याकरिता झटणाऱ्या आणि कर्तृत्ववान कार्यवीरांचा अद्भुत सन्मान सोहळा वीणा इंटरनॅशनल कोल्हापूर आणी ...

Parmanand Tiranik honored with Maharashtra Pride of India Award | परमानंद तिराणिक महाराष्ट्र प्राईड ऑफ इंडिया अवाॅर्डने सन्मानित

परमानंद तिराणिक महाराष्ट्र प्राईड ऑफ इंडिया अवाॅर्डने सन्मानित

विविध क्षेत्रांतील समाजाच्या उन्नतीसाठी व त्यांचे जीवनमान उंचविण्याकरिता झटणाऱ्या आणि कर्तृत्ववान कार्यवीरांचा अद्भुत सन्मान सोहळा वीणा इंटरनॅशनल कोल्हापूर आणी जिव्हाळा कलामंच ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने कला, साहित्य, सांस्कृतिक व सामाजिक संमेलन सोहळा कोल्हापूर येथील छत्रपती शाहू स्मारक सभागृहात नुकताच पार पडला.

या समारंभात शिवकुमार मुरतले, ॲड एस. एन. काळे, मराठी सिनेअभिनेत्री डाॅ. समिरा गुजर जोशी, नगिना माळी, शोभा जिनगी, सुनील चव्हाण, प्रा. बी.एन. खरात उपस्थित होते. यावेळी समिरा गुजर जोशी यांच्या हस्ते महाराष्ट्र प्राईड ऑफ इंडिया अवाॅर्डने परमानंद तिराणिक यांना सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे, परमानंद तिराणिक यांनी लाॅकडाऊनच्या काळात वेळेचा सदुपयोग करीत संविधानाची उद्देशिका स्वत:च्या हस्तक्षरात एक लाख पोस्ट कार्डवर लिहून त्यांनी एक विक्रम प्रस्थापित केला.

Web Title: Parmanand Tiranik honored with Maharashtra Pride of India Award