शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर संसदेत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 06:00 IST

अधिवेशन सुरू झाल्याच्या अगदी पहिल्या दिवशीच धानोरकर यांनी देशाच्या आर्थिक स्थितीवर प्रश्न विचारून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना घेरले. देशामध्ये मंदीची स्थिती निर्माण झाली आहे आणि त्याला केंद्र सरकारच जबाबदार आहे. आता या मंदीचा परिणाम सर्व क्षेत्रात दिसून येत आहे. मंदीमुळे लाखो युवकांना बेरोजगार व्हावे लागले आहे.

ठळक मुद्देदिल्लीत धानोरकर यांनी केला चंद्रपूरचा आवाज बुलंद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश ऊर्फ बाळु धानोरकर यांनी या हिवाळी अधिवेशनात अनेक प्रश्न मांडून चंद्रपूरचा आवाज दिल्लीत बुलंद केला आहे. या अधिवेशनात चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील खासदार धानोरकर यांनी वेगवेगळे प्रश्न मांडल्यामुळे प्रथमच एवढे प्रश्न एकत्रित मांडणारे ते खासदार ठरले आहेत.अधिवेशन सुरू झाल्याच्या अगदी पहिल्या दिवशीच धानोरकर यांनी देशाच्या आर्थिक स्थितीवर प्रश्न विचारून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना घेरले. देशामध्ये मंदीची स्थिती निर्माण झाली आहे आणि त्याला केंद्र सरकारच जबाबदार आहे. आता या मंदीचा परिणाम सर्व क्षेत्रात दिसून येत आहे. मंदीमुळे लाखो युवकांना बेरोजगार व्हावे लागले आहे. या याबाबतीत केंद्र सरकार काय पावले उचलणार आहे, असा सवाल त्यांनी अर्थमंत्र्यांना केला.संपूर्ण देशामधे जशी राष्ट्रीय उद्यान ताडोबाची ओळख आहे, तशीच देशातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रदुषित शहर म्हणून चंद्रपूरची ओळख आहे. हे अजिबात भूषणावह नाही. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरु आहे. त्यामुळे अधिक प्रदुषणास जबाबदार असलेल्या चंद्रपूर वीज केंद्रावर आवश्यक कारवाई करण्यात यावी. तसेच चिमण्यांची उंची वाढवण्यात यावी, यासाठी तातडीची उपाययोजना केली जावी, अशी मागणी खासदार धानोरकर यांनी संसदेत केली.शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जोरपावसाच्या लहरीपणाचा सर्वात अधिक फटका शेतकºयाला बसतो. अनेकदा दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांना नापिकीला सामोरे जावे लागते. वर्षभर शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळाले पाहिजे, यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याची मागणी बाळू धानोरकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला केली. चंद्रपूरमध्ये लोअर पैनगंगा, गोसेखुर्द आणि वाडनेर प्रकल्प अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. ते कधी पुर्ण होणार याची माहिती सरकारने सभागृहाला द्यावी अशी माणगी खासदार धानोरकर यांनी केली.कापूस उत्पादकांना ३० हजार एकरी मदत द्याविदर्भातील विशेषत: झाडीपट्टीतील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले, त्यासाठी राज्याने दिलेली मदत अत्यंत अत्यल्प आसल्याने किमान धान उत्पादकांना २५ हजार रुपये एकरी मदत द्यावी तसेच कापूस उत्यादक शेतकऱ्यांना ३० हजार एकरी मदत केंद्र सरकारने द्यावी, अशी मागणी त्यांनी लोकसभेत केली. एवढेच नाही तर केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना याचा पाठपुरावा करण्यासाठी पत्रदेखील लिहिले.ओबीसी समाजाच्या मागणीकडेही लक्ष वेधलेअनेक वर्षांपासून समाजाचा महत्त्वाचा भाग असलेल्या ओबीसी वर्गाच्या जनगणनेचा प्रलंबित प्रश्न निकालात काढण्यात यावा, अशी मागणी देखील त्यांनी या हिवाळी अधिवेशनात संसदेत केली. १९३१ साली ओबीसींची जनगणना करण्यात आली, त्यात ओबीसींची संख्या ५२ टक्के होती. त्याआधारे मंडल आयोगाने २७ टक्के आरक्षण ओबीसी समाजाला दिले. पण २०२१ चा जनगणना कार्यक्रम सरकारने जाहीर केला आहे. त्यासाठी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये प्रीटेस्ट झाली. पण त्याच्या नमुना प्रश्नावलीच्या १३ नंबर कॉलममध्ये ओबीसीचा उल्लेख नाही. ओबीसीसाठी कॉलम नसल्यामुळे आंदोलन केले जात आहे. २०२१ च्या जनगणनेत ओबीसी कॉलम नाही, तर जनगणनेत आमचा सहभाग नाही, अशा पाटया लावून २०२१ च्या जणगनेवर बहिष्कार घालण्याचे आंदोलन सुरू झाले आहे. म्हणून, ओबीसी साठीचा कॉलम २०२१ च्या जनगणनेत समाविष्ट करण्यात यावे याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.