चंद्रपूर-नागपूर मार्गावर शोरूम मालकांचे रस्त्यावर पार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:29 IST2021-09-25T04:29:44+5:302021-09-25T04:29:44+5:30

चंद्रपूर : येथील नागपूर मार्गावरील दुचाकी, चारचाकी, टॅक्टर तसेच क्रेशन शोरूम मालकांनी रस्त्यावर वाहन पार्किंग सुरू केली आहे. रस्ता ...

Parking on the road of showroom owners on Chandrapur-Nagpur road | चंद्रपूर-नागपूर मार्गावर शोरूम मालकांचे रस्त्यावर पार्किंग

चंद्रपूर-नागपूर मार्गावर शोरूम मालकांचे रस्त्यावर पार्किंग

चंद्रपूर : येथील नागपूर मार्गावरील दुचाकी, चारचाकी, टॅक्टर तसेच क्रेशन शोरूम मालकांनी रस्त्यावर वाहन पार्किंग सुरू केली आहे. रस्ता चौपदरी असतानाही अनेकवेळा वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने वाहतूक पोलिसांकडे निवेदनही दिले आहे. मात्र, काहीच कारवाई झाली नाही. या वाहनांमुळे अन्य वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

चंद्रपूर-नागपूर मार्गावर जनता काॅलेज चौकापासून तर पुढे वडगावपर्यंत अनेक शोरूम आहे. या मार्गावर शोरूम समोर मोठ्या प्रमाणात नवीन वाहनांची पार्किंग केली जाते. विशेष म्हणजे, वाहन घेणाऱ्या ग्राहकांचीही गर्दी असते. शोरूम चालकाने नियमाचे उल्लंघन करून मुख्य रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. एरवी वाहतून पोलीस प्रशासन सामान्य नागरिकांवर कारवाई करताना दिसून येते. मात्र, मोठ मोठ्या शोरूम मालकांनी चक्क अर्ध्या रस्त्यावरच कब्जा केला असतानाही त्यांना हे कसे काय दिसत नाही, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.

Web Title: Parking on the road of showroom owners on Chandrapur-Nagpur road