शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

मार्केटच्या बाहेर वाहनतळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 12:58 AM

येथील व्यापारपेठेच्या बाहेर जुन्या बसस्थानक शेडच्या जागेवर घाईघाईत वाहनतळ तयार करण्याची मागणी करून ठराव मंजूर करण्यात आला.

ठळक मुद्देघुग्घुस ग्रामपंचायत : सदस्य-पदाधिकाºयांची भूमिका संशयाच्या भोवºयात

लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : येथील व्यापारपेठेच्या बाहेर जुन्या बसस्थानक शेडच्या जागेवर घाईघाईत वाहनतळ तयार करण्याची मागणी करून ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे पूर्वीच विविध विषयांवर ग्रामपंचायत पदाधिकाºयांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना यात आणखी भर पडली आहे. ग्रामपंचायत सदस्यांचे तत्काळ निर्णय व ग्रामसेवकाची भुमिका संशयास्पद ठरली याबाबत गावकºयांत चर्चा सुरू आहे.२७ वर्षांपासून निरुपयोगी जुन्या बस शेडवरून चांगलेच वादळ सुरू झाले. शिवसेनेचे शहर अध्यक्ष मुन्ना लोडे यांनी २५ आॅक्टोबर रोजी दुर्लक्षित बस शेडची दुरूस्ती करून सार्वजनिक वाचनालय सुरू करण्याची मागणी ग्रामपंचायतीकडे केली. तशा वृत्तपत्रात बातम्या झळकल्या. दरम्यान २७ आॅक्टोबरला ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत त्या शेडच्या ठिकाणी वाहनतळ बनविण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला.त्या परिसरात व्यापारी संकुल असले तरी त्याही पेक्षा अधिक आवश्यकता बॅक आॅफ इंडिया ते गांधी चौक, विद्या टॉकीज पंचशील चौक, ग्रामपंचायतीकडून गांधी चौक तर गांधी चौक ते पोळा मैदान अशा तिनही रस्त्यावर गजबजलेली व्यापारपेठ आणि वाहने दुकानासमोर उभे राहत असतात. रस्ते अरुंद असल्यामुळे वाहतुकीला नेहमी अडथळा निर्माण होत असते. त्या परिसरात वाहनतळ बनविण्याची गरज आहे.त्या परिसरात मुत्रीघर, सुलभ शौचालय बांधण्याबाबत गांधी चौकातील व्यापारी वर्गाने ग्रामपंचायतीकडे अनेकदा मागणी केली. मात्र त्याकडे ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी लक्ष दिले नाही. तर अचानक बस शेडचा सार्वजनिक वाचनालयाकरिता वापर करावा, अशी मागणी शिवसेनेने करताच काही नागरिकांनी वाहनतळाची मागणी केली आणि ते शेड कोणाच्या जागेवर, कोणाच्या ताब्यात आहे, याची चौकशी न करता तत्काळ ठराव मंजूर करण्यात आला आहे.या शेडच्या समोर वाईनशॉप, बिअरबार होते. दारूबंदीच्या पूर्वी येथे दिवसभर गजबज असायची. दुचाकी, चारचाकी वाहने रस्त्यावर उभी असायची. तेव्हा वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. त्यावेळी येथे वाहनतळ बनविण्याची कल्पना कुणाला सुचली नाही. मात्र सार्वजनिक वाचनालयाची मागणी करताच येथे वाहनतळ निर्माण होणार असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.