परिणीता भोयर, गायत्री बजाईतची चित्रकला स्पर्धेत बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:12 IST2021-01-13T05:12:17+5:302021-01-13T05:12:17+5:30
फोटो : बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांसह पाहुणे. चंद्रपूर : विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील कंटाळा दूर होऊन बाहेरील ...

परिणीता भोयर, गायत्री बजाईतची चित्रकला स्पर्धेत बाजी
फोटो : बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांसह पाहुणे.
चंद्रपूर : विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील कंटाळा दूर होऊन बाहेरील वातावरणात नवीन काही तरी करण्यास मिळावे यासाठी वनिता फुड्सच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी नि:शु्ल्क चित्रकला स्पर्धा तसेच महिला-पुरुषांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अ गटातील चित्रकला स्पर्धेत परिणीता भोयर तर ब गटामध्ये गायत्री बजाईत हिने प्रथम क्रमांक पटकावला.
विजयी स्पर्धकांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी अ गटामध्ये द्वितीय क्रमांक स्तवन दुबे, तिसरा क्रमांक अद्विक दातारकर, ब गटामध्ये द्वितीय क्रमांक लावण्या प्रवीण कौरासे, तिसरा क्रमांक गौरी क्षीरसागर यांनी पटकाविला. पुरुष व महिलांसाठी आयोजित रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रद्धा हिवरे, दुसरा अनिल मोरे, तृतीय भाग्यश्री कौरासे यांनी पटकाविला. प्रास्ताविक वनिता आहारचे संचालक विनायक धोटे यांनी केले. यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याबाबत आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन विनोद गोरे, आभार अविनाश मिश्रा यांनी मानले. कार्यक्रमासाठी वनिता फूड्सच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.