वारकऱ्यांसह एसटीलाही पंढरीची ओढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:20 IST2021-07-20T04:20:18+5:302021-07-20T04:20:18+5:30
दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठ्ठलांची वारी करण्यात येते. यामध्ये अनेक वारकरी सहभागी होत असतात. या वारीसाठी महामंडळातर्फे विशेष बसफेऱ्या ...

वारकऱ्यांसह एसटीलाही पंढरीची ओढ
दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठ्ठलांची वारी करण्यात येते. यामध्ये अनेक वारकरी सहभागी होत असतात. या वारीसाठी महामंडळातर्फे विशेष बसफेऱ्या सोडण्यात येतात. चंद्रपूर आगारातर्फे साधारत: २० बसफेऱ्या सोडण्यात येत होत्या. त्याला प्रवशांचासुद्धा उत्तम प्रतिसाद लाभला होता. यातून महामंडळाला लाखोंचे उत्पन्न मिळत होते; परंतु मागील वर्षीपासून कोरोनाचे सावट आल्याने पंढरपूरच्या वारीवर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे महामंडळाच्या बसफेऱ्या बंद आहेत. परिणामी, भाविकांना पंढरपूरच्या वारीला जाण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे वारकऱ्यांसह एसटीलाही पंढरीची ओढ लागली आहे.
बॉक्स
दरवर्षी जिल्ह्यातून जातात पालख्या
आषाढी एकादशीनिमित्त जिल्ह्यातून अनेक पालख्या पंढरपुरात जात होत्या. साधारणत: दरवर्षी दहा ते बारा पालख्या चंद्रपुरातून जात होत्या. यासोबतच बसनेसुद्धा अनेक जण वारीला जात होते.
पंढरपुरात पोहोचताच दिड्यांमध्ये सहभागी होणारे वारकरी चंद्रभागेत स्नान करतात. पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीत शेकडो वारकऱ्यांचा समावेश असतो. दिंडी जसजशी पुढे मार्गक्रमण करते, तशी या दिंडीतील वारकऱ्यांची संख्या वाढत जाते. प्रत्येक दिंडीचा दिनक्रम ठरलेला असतो. यात पहाटे काकडा आरती, संध्याकाळी हरिपाठ व रात्री मुक्कामाच्या ठिकाणी हरिकीर्तन असा कार्यक्रम असतो. दररोज १५ ते २० किलोमीटर पायपीट करीत वारकरी पंढरपुरात पोहोचत असतात.
बॉक्स
वारकऱ्यांचा हिरमोड
कोरोनामुळे सलग दुसऱ्यावर्षी पंढरपूरची वारी होत नाही. त्यामुळे वारकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. अनेक जण एकादशीच्या अगोदरही जावून दर्शन घेऊन येण्याचे नियोजन करीत आहेत. तर काही जणांनी पंढरी गाठली आहे.
बॉक्स
वारकऱ्यांचेही गावी मन रमेना!
दरवर्षी न चुकता वारीला जात होतो; मात्र मागील दोन वर्षांपासून वारीला जाणे बंद आहे. त्यामुळे घरीच विठ्ठलाचे नामस्मरण करीत आहे.
-वारकरी
---ब
मागील पिढ्यांपासून वारीला जाण्याच्या आमच्या कुटुंबाची परंपरा आहे; परंतु कोरोनामुळे दोन वर्षांपासून वारीला खंड पडत आहे. घरीच आषाढी एकादशीनिमित्त कार्यक्रम घेत असतो.
-वारकरी