चंद्रपूर जिल्ह्यातल्या घुग्घुस येथील पंचायत समिती सदस्य शालू शिंदे यांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 13:59 IST2018-01-09T13:58:25+5:302018-01-09T13:59:17+5:30
घुग्घुस पंचायत समिती सदस्य शालू विवेक शिंदे यांनी आज मंगळवार सकाळी १० च्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.

चंद्रपूर जिल्ह्यातल्या घुग्घुस येथील पंचायत समिती सदस्य शालू शिंदे यांची आत्महत्या
ठळक मुद्देकारण गुलदस्त्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: घुग्घुस पंचायत समिती सदस्य शालू विवेक शिंदे यांनी आज मंगळवार सकाळी १० च्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. त्या मागील पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चंद्रपूरला पाठवण्यात आला आहे. त्यांचा ब्युटीपार्लरचा व्यवसाय होता.