धान पऱ्ह्यांची रोवणी सुरू

By Admin | Updated: August 5, 2014 23:44 IST2014-08-05T23:44:06+5:302014-08-05T23:44:06+5:30

खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर पावसाने हजेरी लावली. पावसाने दडी मारल्याने धान पेरणी केलेल्या उगवलेले पऱ्हे उष्णतेमुळे करपून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार

Paddy rowing continues | धान पऱ्ह्यांची रोवणी सुरू

धान पऱ्ह्यांची रोवणी सुरू

सिंदेवाही : खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर पावसाने हजेरी लावली. पावसाने दडी मारल्याने धान पेरणी केलेल्या उगवलेले पऱ्हे उष्णतेमुळे करपून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. याचा फटका शेतकऱ्यांना बसला. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली.
मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून सिंदेवाही तालुक्यात धान पऱ्हे रोवणीला प्रारंभ झालेला आहे. यावर्षी खरीप हंगामाध्ये सिंदेवाही तालुक्यात १८ हजार हेक्टर क्षेत्र धान पीक लागवडीखाली आहे, तर २२ हेक्टरवर आवत्याची पेरणी करण्यात आली आहे. आता धान पऱ्हे पेरणी योग्य झाले असून तालुक्यात आतापर्यंत २५ टक्के रोवणी झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची विहीर व विद्युत पंप, बोरवेलची सोय आहे, त्या शेतकऱ्यांनी रोवणी सुरू केलेली आहे. जे शेतकरी निसर्गाच्या भरवशावर आहेत, ते शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तलाव व बोड्या भरण्यासाठी साधारणत: १ हजार २०० मि.मी. पावसाची आवश्यकता आहे. यावर्षी आतापर्यंत ५७५ मिमि पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
यावर्षी भात संशोधन केंद्राने विकसीत केलेल्या पीकेव्ही खमंग, पीकेव्ही मकरंद पीकेव्ही गणेश, पीकेव्ही किसान या वाणाची, कृषी सेवा केंद्रातून जय श्रीराम, सुवासिक ५५५, हिरा, सायराम नर सर्व सामान्य शेतकरी एचएमटी, श्रीराम बलवान परभणी, सोनम, क्रांती, ओमशांती या वाणाची लागवड केली आहे. सध्या महिला मजुरांची रोवण्याची मजुरी ८० ते १०० रुपयांपर्यंत गेली आहे. तालुक्यात सिंचन प्रकल्प नाहीत. भविष्यात हुमन व गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना निसर्गाशिवाय पर्याय नाही. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Paddy rowing continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.