शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

दीड लाख हेक्टर क्षेत्रावर होणार भात रोवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 22:56 IST

जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस पडल्याने नदी, नाले व गावतलाव तुडूंब भरले आहेत. भात रोवणीसाठी पुरेसा पाऊस पडल्याने यंदा खरीप हंगामात एक लाख ५१ हजार ५५५ हेक्टर क्षेत्रात भात रोवणी होऊ शकते, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. गतवर्षी १७ हजार ७०० हेक्टर क्षेत्रात रोवणी न करता शेतकऱ्यांनी आवत्या भात टाकला होता. यंदाच्या पावसाची स्थिती लक्षात घेता आवत्या भाताचे क्षेत्र शुन्यावर येऊ शकते, अशी माहितीही सूत्राने दिली.

ठळक मुद्देदमदार पावसाने शेतकरी आशावादी : आवत्या भाताचे क्षेत्र यंदा घटणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस पडल्याने नदी, नाले व गावतलाव तुडूंब भरले आहेत. भात रोवणीसाठी पुरेसा पाऊस पडल्याने यंदा खरीप हंगामात एक लाख ५१ हजार ५५५ हेक्टर क्षेत्रात भात रोवणी होऊ शकते, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. गतवर्षी १७ हजार ७०० हेक्टर क्षेत्रात रोवणी न करता शेतकऱ्यांनी आवत्या भात टाकला होता. यंदाच्या पावसाची स्थिती लक्षात घेता आवत्या भाताचे क्षेत्र शुन्यावर येऊ शकते, अशी माहितीही सूत्राने दिली.जिल्ह्यामध्ये सरासरी पर्जन्यमान ११४२ मिमी इतकी आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात सर्वच तालुक्यात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे धान, सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकºयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. गतवर्षी ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही व सावली तालुक्यात रोवणी करण्याऐवजी शेकडो शेतकºयांनी आवत्या भात टाकला होता. पावसाने दगा दिल्याने शेतकºयांवर ही वेळ आली होती. एक लाख ४६ हजार ५२७ हेक्टर क्षेत्रावर भात रोवणीचे नियोजन केले असले तरी प्रत्यक्षात १ लाख २० हजार हेक्टर क्षेत्रावरच रोवणी झाली. पावसाने दीर्घ खंड दिल्याने आवत्या भात टाकणाºया शेतकºयांनाही आर्थिक फटका बसला होता. कृषी विभागाच्या अहवालानुसार १ लाख १७ हजार २४७ हेक्टर क्षेत्रावरील धान पिकाला तुळतुळी किडींनी उद्धवस्त केले. जिल्ह्यातील सोयाबिनचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ४९ हजार ५४९ क्षेत्रावरच सोयाबीन पेरणी होऊ शकली.१ लाख ७१ हजार हेक्टर क्षेत्रावरील कापूस लागवडीपैकी सुमारे ६० हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्षात लागवड झाली. ३६ हजार ६०२ हेक्टर क्षेत्रावर तूर पेरणी करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले होते. त्यापैकी ३२ हजार ५७५ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. कृषी विभागाने तयार केलेले पीक पेरणीचे नियोजन आणि प्रत्यक्षात झालेली पेरणी विचारात घेतल्यास पावसाच्या अनियमिततेमुळे गतवर्षीच्या खरीप हंगामाला मोठा फटका बसला. यंदाच्या खरीप हंगामात एकून ४ लाख ७९ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात आले मान्सूनच्या आगमणापासूनच जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडत आहे. त्यामुळे यंदाच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ होणार आहे. पावसाने उसंत दिल्यानंतर जिल्ह्यात भात रोवणीला वेग येणार आहे.नियोजनाअभावी सिंचन उद्दिष्टपूर्ती अशक्यजिल्ह्यामध्ये दीडशे लघुसिंचन प्रकल्प, १ हजार ५९३ मध्यम, स्थानिक स्तर सिंचन प्रकल्पासह ९७ सिंचन प्रकल्प आहेत. प्रत्येक प्रकल्पाची सिंचन क्षमता निर्धारीत करण्यात आली आहे. खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामात या प्रकल्पांमधून किती हेक्टर क्षेत्रावर सिंचन होवू शकते, याचे नियोजन कृषी विभागाने केले. सद्यस्थितीत जिल्ह्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस असल्याने सिंचन प्रकल्पांची स्थिती उत्तम आहे. मात्र प्रकल्पातील उपलब्ध जलसाठ्याचे नियोजन केले नाही तर अपेक्षित सिंचन उद्दिष्ट साध्य होण्याची शक्यता कमीच आहे.कापूस उत्पादक शेतकºयांमध्ये धडकीयंदाच्या खरीप हंगामात १ लाख ९७ हजार २०० हेक्टर क्षेत्रामध्ये कापूस लागवडीचे नियोजन करण्यात आले. नगदी पीक म्हणून जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील शेतकºयांनी कमी-अधिक प्रमाणात कापूस लागवडीला प्राधान्य दिले. गतवर्षी बोंडअळीने शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले होते. मात्र पारंपरिक पिकांमधून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने यावर्षीदेखील शेतकºयांनी कापूस लागवड केली. मात्र कोरपना, राजुरा, जिवती, भद्रावती व वरोरा तालुक्यामध्ये कापसावर किडींचा प्रादुर्भाव होण्याची लक्षणे दिसत आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये धडकी भरली आहे.