धान उत्पादन घटले, भावही घसरले
By Admin | Updated: January 28, 2015 23:11 IST2015-01-28T23:11:20+5:302015-01-28T23:11:20+5:30
यावर्षी धानाचे उत्पन्न घटले आहे. उत्पादन घटल्यामुळे बाजारभाव वाढेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असताना भाव घसरल्याने सध्या शेतकरी चिंतेत सापडले आहे. विशेष म्हणजे, धान खरेदीसाठी

धान उत्पादन घटले, भावही घसरले
आधारभूत किंमत नसल्याने शेतकरी चिंतातुर : व्यापाऱ्यांनीही धान खरेदीकडे फिरविली पाठ
राजू गेडाम - मूल
यावर्षी धानाचे उत्पन्न घटले आहे. उत्पादन घटल्यामुळे बाजारभाव वाढेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असताना भाव घसरल्याने सध्या शेतकरी चिंतेत सापडले आहे. विशेष म्हणजे, धान खरेदीसाठी व्यापाऱ्यांनीही यावर्षी पाठ फिरवली आहे.
अर्थशास्त्राच्या मागणीवरच पुरवठा अवलंबून असतो. मात्र शेतकऱ्यांच्या पिकांबाबत उलट चित्र आहे. २०१३ ते १४ या वर्षात उत्पन्न चांगले होते. त्याचबरोबरच धानाला भाव देखील योग्य होता. मात्र यावर्षी जिल्ह्यात दुष्काळाचे सावट असल्याने जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये उत्पादनात घट आली आहे. उत्पानादन कमी असल्याने भाव मिळायला पाहिजे, मात्र यावेळी चित्र बदलले आहे.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या धानाची आवक आहे. धानाला भाव कमी असताना देखील व्यापारी धान घ्यायला तयार नाही.
मागील वर्षी जानेवारी २०१४ मध्ये एक लाख धान पोत्यांची आवक होती. मात्र यावर्षी ८० हजार पोत्यांची आवक आहे. मागील वर्षी दररोज दोन ते अडीच हजार पोते बाजार समितीत विक्रीसाठी शेतकरी आणायचे. आजच्या स्थितीत एक ते दीड हजार पोते विक्रीसाठी येत असल्याचे चित्र आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सावली, चामोर्शी, सिरोंचा, चिमूर आदी तालुक्यातील धान विक्रीसाठी येतोे. मात्र यावर्षी उत्पादनही नाही आणि भावही नाही अशी स्थिती आहे.
एक तर पिक कमी त्यातच भाव नसल्याने शेतकरी सध्या हवालदिल झाला आहे.