शंकरपूर व नेरी येथील धान उत्पादकांना विमा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2015 01:04 IST2015-08-01T01:04:26+5:302015-08-01T01:04:26+5:30
चिमूर तालुक्याला यावर्षी ८ कोटी ९२ लाख रुपयांचा विमा प्राप्त झाला असला तरी शंकरपूर, नेरी या दोन महसूल सर्कलमधील धान उत्पादक शेतकऱ्यांना वगळले आहे.

शंकरपूर व नेरी येथील धान उत्पादकांना विमा नाही
चिमूर: चिमूर तालुक्याला यावर्षी ८ कोटी ९२ लाख रुपयांचा विमा प्राप्त झाला असला तरी शंकरपूर, नेरी या दोन महसूल सर्कलमधील धान उत्पादक शेतकऱ्यांना वगळले आहे.
शंकरपूर महसूल सर्कलमध्ये ७५५ धान उत्पादक शेतकऱ्यांनी विमा काढला होता. त्यासाठी ३ लाख ७२ हजार ५७७ रुपये शेतकऱ्यांनी विमा कंपनीला दिले तर नेरी महसूल सर्कलमध्ये १ हजार ७७४ धान उत्पादक शेतकऱ्यांनी विमा काढला. त्यासाठी ९ लाख ६६ हजार ३२६ रुपये शेतकऱ्यांनी विमा कंपनीला दिले. परंतु या दोन्ही महसूल सर्कलमधील शेतकऱ्यांना विमा कंपनीने भरपाई दिली नाही.
या दोन्ही सर्कलमध्ये मागील वर्षीच्या खरीप हंगामात धान उत्पादन झाले नाही. हे उत्पादन न झाल्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदतही दिली. परंतु हक्काने विमा काढल्याने विम्याचे पैसे धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे होते. परंतु अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाही. एकीकडे निसर्ग, दुसरीकडे शासन तर तिसरीकडे विमा कंपनी धान उत्पादक शेतकऱ्यांची थट्टा करीत आहे. याबाबत तालुका कृषी अधिकारी पवार यांनी विमा हा मागील पाच वर्षाच्या उत्पादक उंबरठ्यावर मिळत असल्याचे सांगितले.