पॅकेज टूर्समधून एस.टी.ने करता येणार आता पर्यटनवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:19 IST2021-01-01T04:19:35+5:302021-01-01T04:19:35+5:30
चंद्रपूर-हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्प - भामरागड त्रिवेणी संगम-चंद्रपूर अशी बस चालविण्यात येणार आहे. ही बस शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुटीच्या ...

पॅकेज टूर्समधून एस.टी.ने करता येणार आता पर्यटनवारी
चंद्रपूर-हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्प - भामरागड त्रिवेणी संगम-चंद्रपूर अशी बस चालविण्यात येणार आहे. ही बस शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशी पर्यटकांना घेऊन सकाळी ८.३० वाजता निघणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ६.३० वाजता परत येणार आहे. या बसला एका पर्यटकाला तिकिटापोटी ४६५ रुपये आकार आहे. १२ वर्षांखालील मुलाला २३० रुपये लागणार आहेत; तर मार्कंडा देव, झोपला मारोती देवस्थान, बटरफ्लाॅय गार्डन, आगरझरी या ठिकाणी जाणेही आता अगदी सोपे होणार आहे. या ठिकाणी जाण्यासाठी शनिवार, रविवार तसेच सुटीच्या दिवशी सकाळी आठ वाजता पर्यटकांना घेऊन बस निघणार असून सायंकाळी सहा वाजता परत येणार आहे. यासाठी प्रौढांसाठी २३०, तर १२ वर्षांखालील मुलांसाठी ११५ रुपये तिकीट आकारले जाणार आहे. या बसचे पर्यटकांना आरक्षण करावे लागणार आहे. दरम्यान, एखाद्या पर्यटनस्थळ, धार्मिक स्थळ, ऐतिहासिक वास्तुदर्शनासाठी ग्रुप बुकिंगसाठी बस पाहिजे असल्यास चंद्रपूर विभागातील चंद्रपूर, राजुरा, चिमूर, वरोरा येथूनही बस मिळणार आहेत. पर्यटन स्थळावरील प्रवेश शुल्क प्रवाशांना द्यावे लागणार आहे.
कोट
पर्यटकांना विनाअडथळा पर्यटन करता यावे, त्यांना त्रास होऊ नये; तसेच महामंडळाला यातून उत्पन्न मिळावे, यासाठी पॅकेज टुर्स बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बस बुकिंग करूनही पर्यटकांना पर्यटनासाठी जाता येणार आहे. अधिकाधिक पर्यटकांनी याचा लाभ घ्यावा.
- आर. एन. पाटील
विभागीय नियंत्रक, चंद्रपूर