आंतरराज्यीय वाहनाद्वारे ओव्हरलोड वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:23 IST2021-01-09T04:23:43+5:302021-01-09T04:23:43+5:30
चंद्रपूर : मुंगोली खदान येथून ओव्हरलोड वाहतूक करून राज्याचा कर चुकवणाऱ्या आंतरराज्यीय दोन हायवा टिप्परच्या मालकांवर वाहतूक शाखेने ८५ ...

आंतरराज्यीय वाहनाद्वारे ओव्हरलोड वाहतूक
चंद्रपूर : मुंगोली खदान येथून ओव्हरलोड वाहतूक करून राज्याचा कर चुकवणाऱ्या आंतरराज्यीय दोन हायवा टिप्परच्या मालकांवर वाहतूक शाखेने ८५ हजार रुपयांचा दंड थोटवून जप्त केले. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली.
हायवा ट्रकद्वारे ओव्हरलोड वाहतूक होत असल्याची माहिती चंद्रपूर जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर त्यांचे पथक मुंगोली परिसरात गेले असता, आर जे २१ जीसी ३०२० व आर जे २१ जीसी -४३१६ राजस्थान पासिंगच्या गाड्या ओवरलोड भरलेल्या आढळून आल्या. त्यांनी वाहनांची तपासणी केली असता, दोन्ही वाहने नॅशनल परमिट असून महाराष्ट्र राज्याचा कर न भरता लोकलमध्ये चालवताना निदर्शनास आले. त्यामुळे दोन्ही वाहने जप्त करून घुग्घुस पोलीस स्टेशनच्या स्वाधिन करण्यात आले. दोन्ही वाहनांवर ८५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. ही कारवाई वाहतूक पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार विष्णू नागरगोजे, संजय धोटे, विकास मार्कंडे आदींनी केली.
बाहेर राज्यातून येऊन अवैधरीत्या महाराष्ट्र राज्यात काम करणाऱ्या अवैध वाहनावर कार्यवाहीची ही पहिलीच वेळ आहे.