रागावर मात करून आनंदी जीवन जगा

By Admin | Updated: May 24, 2016 01:20 IST2016-05-24T01:20:39+5:302016-05-24T01:20:39+5:30

राग माणसाला नष्ट करतो. त्यामुळे रागावर मात करून आपले श्रेष्ठ जीवन आनंदात जगा, ...

Overcoming rage, you have a happy life | रागावर मात करून आनंदी जीवन जगा

रागावर मात करून आनंदी जीवन जगा

ई.व्ही. गिरीश : ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या कार्यक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद
राजुरा : राग माणसाला नष्ट करतो. त्यामुळे रागावर मात करून आपले श्रेष्ठ जीवन आनंदात जगा, असे प्रतिपादन ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय मुंबईचे प्रा.ई.व्ही. गिरीश यांनी लोकमत सखी मंच राजुराद्वारा आयोजित कार्यक्रमात केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार प्रभाकर मामुलकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर गडचिरोली वणी क्षेत्राच्या राजयोगिनी ब्रम्हाकुमारी कुसुमदिदी, माजी आमदार सुदर्शन निमकर, नगर परिषद राजुराचे उपाध्यक्ष अरुण धोटे, राजयोगी ब्रम्हकुमार दीपकभाई, राजुरा व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष बंडू माणुसमारे, जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, प्रा. संभाजी, डॉ.बाबा कल्लुरवार, लोकमत सखी मंच राजुराचे सहसंयोजिका कृतिका सोनटक्के, सास्ती संयोजिका संध्या पत्तेवार उपस्थित होते.

Web Title: Overcoming rage, you have a happy life