थकबाकीदार सदस्य मतदानापासून राहणार दूर
By Admin | Updated: March 2, 2015 01:06 IST2015-03-02T01:06:15+5:302015-03-02T01:06:15+5:30
मागील एक वर्षांपासून वेगवेगळ्या कारणाने नियोजित निवडणूक प्रक्रिया लांबणीवर ठेवाव्या लागल्या. मात्र नव्या वर्षात सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया शासनाने सुरू केली आहे.

थकबाकीदार सदस्य मतदानापासून राहणार दूर
राजकुमार चुनारकर खडसंगी
मागील एक वर्षांपासून वेगवेगळ्या कारणाने नियोजित निवडणूक प्रक्रिया लांबणीवर ठेवाव्या लागल्या. मात्र नव्या वर्षात सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया शासनाने सुरू केली आहे. त्यामध्ये चिमूर तालुक्यातील डी.डी.आर कार्यालयांतर्गत येणाऱ्या ४४ सहकारी संस्थेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू असली तरी, शासनाच्या नवीन नियमानुसार अनेक थकबाकीदार सदस्य मतदान प्रक्रियेपासून दूर राहणार आहेत.
राज्याच्या राजकारणामध्ये सहकार क्षेत्राची चांगलीच पकड आहे. सहकार क्षेत्राचा सरळ संबंध गावागावातील शेतकऱ्यांशी येतो. त्यामुळे राजकीय क्षेत्रातील पकड मजबुत करण्यासाठी अनेक पुढारी सहकार क्षेत्रात आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करतात. सहकार क्षेत्रात सहकारी संस्थेचे सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती तथा स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य विधान परिषदेतील आमदार निवडीच्या प्रक्रियेत सुद्धा महत्त्वाचा दुवा ठरतात.
राज्यात सध्या सहकारी संस्थाच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. चिमूर तालुक्यात आज घडीला एकूण ४४ सहकारी संस्था आहेत. त्यामध्ये ब गटाच्या १४ तर क गटाच्या ३० संस्था आहेत. तालुक्यातील ३० संस्थापैकी २३ संस्थांची निवडणूक प्रक्रिया पार पडली असून उर्वरीत संस्थेच्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहेत. ब गटाच्या १४ सहकारी संस्थापैकी ४ संस्थेच्या निवडणुका सुरू असून १० संस्थेच्या निवडणूक सुरू व्हायच्या, असल्याची माहिती दुय्यम निबंधक कार्यालयाने दिली.
चिमूर तालुक्यातील सहकारी संस्थाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून अनेक संस्थाच्या निवडणुका अविरोध झाल्या आहेत. मात्र नवेगाव पेठ, वहानगाव, खडसंगी अशा अनेक गावातील व अनेक तालुक्यातील सहकारी संस्थाच्या निवडणुका होत आहेत.