जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:30 IST2021-03-23T04:30:25+5:302021-03-23T04:30:25+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक अजूनही सुरूच आहे. रविवारी दोनशेहून अधिक रुग्ण आढळून आले होते. सोमवारी पुन्हा १२३ नव्या ...

Outbreaks of corona continue in the district | जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच

चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक अजूनही सुरूच आहे. रविवारी दोनशेहून अधिक रुग्ण आढळून आले होते. सोमवारी पुन्हा १२३ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. सोमवारी ७२ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सोमवारी तीन बाधिताचा मृत्यूही झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २५ हजार ८५६ वर पोहोचली आहे, तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २४ हजार १३८ झाली आहे. सध्या १,३०५ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख ५२ हजार ४६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी दोन लाख २१ हजार १७१ नमुने निगेटिव्ह आले आहेत.

कोरोनाचे रुग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातून आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला, या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करून सुरक्षित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

बॉक्स

तिघांचा मृत्यू

सोमवारी मृत झालेल्यामध्ये सिंदेवाही येथील ७५ वर्षीय पुरुष, सरकार नगर, चंद्रपूर, येथील ७८ वर्षीय पुरुष व कुकुडसा ता.कोरपना येथील ५५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४१३ बाधितांचा मृत्यू झाला असून, यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३७४, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १९, यवतमाळ १६, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

बॉक्स

सोमवारचे तालुकानिहाय बाधित

चंद्रपूर महानगरपालिका हद्द - ३४,

चंद्रपूर तालुका - ५

बल्लारपूर - १८

भद्रावती - २४

ब्रह्मपुरी - १५

मूल - २

सावली - ७

चिमूर - १०

वरोरा - ५

कोरपना -२

इतर - १

Web Title: Outbreaks of corona continue in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.