कोरोना संसर्गाचा उद्रेक हाताबाहेर ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:27 IST2021-04-10T04:27:56+5:302021-04-10T04:27:56+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ३१ हजार ९५२ वर पोहोचली आहे. सुरूवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २७ हजार २६० ...

Outbreak of corona infection out of hand? | कोरोना संसर्गाचा उद्रेक हाताबाहेर ?

कोरोना संसर्गाचा उद्रेक हाताबाहेर ?

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ३१ हजार ९५२ वर पोहोचली आहे. सुरूवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २७ हजार २६० झाली आहे. सध्या चार हजार २२७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख ९५ हजार ५०८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन लाख ५८ हजार ६६३ नमुने निगेटिव्ह आले आहेत. २४ तासात ३२४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली. आज मृत झालेल्यामध्ये चिमूर येथील ५२ वर्षीय पुरूष व वरोरा येथील ७८ वर्षीय पुरूष, ६५ वर्षीय महिला व ५९ वर्षीय महिला, भद्रावती येथील ६७ वर्षीय पुरूष, दुर्गापूर चंद्रपूर येथील ४९ वर्षीय पुरूष व ६४ वर्षीय पुरूष, बल्लापूर येथील ६८ वर्षीय महिला, ब्रह्मपूरी येथील ४० वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४६५ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ४२२, तेलंगणा व बुलडाणा प्रत्येकी एक, गडचिरोली २०, यवतमाळ १९, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. नागरिकांनी त्रिसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच ४५ वर्षांवरील सर्वांनी जवळच्या केंद्रावरून लस घ्यावी, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

तालुकानिहाय रूग्ण

चंद्रपूर मनपा क्षेत्र १९७

चंद्रपूर तालुका ४०

बल्लारपूर ६४

भद्रावती ३५

ब्रह्मपुरी ४७

नागभीड ३०

सिंदेवाही २२

मूल १९

सावली १६

गोंडपिपरी ०६

राजूरा २४

चिमूर १०१

वरोरा ११८

कोरपना ५८

जिवती ०१

अन्य ०७

Web Title: Outbreak of corona infection out of hand?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.