केबलमधून विद्युत तारा बाहेर

By Admin | Updated: February 12, 2015 00:51 IST2015-02-12T00:51:06+5:302015-02-12T00:51:06+5:30

शहर सुटसुटीत करण्यासाठी व विजेचा संभाव्य धोका कमी करण्यासाठी मूल शहरात भूमिगत विद्युत केबल टाकण्यात येत आहे.

Out of the electric cable in the cable | केबलमधून विद्युत तारा बाहेर

केबलमधून विद्युत तारा बाहेर

मूल : शहर सुटसुटीत करण्यासाठी व विजेचा संभाव्य धोका कमी करण्यासाठी मूल शहरात भूमिगत विद्युत केबल टाकण्यात येत आहे. मात्र या कामात अतिशय बेजबाबदारपणा दाखविला जात असल्याचे आता दिसून येत आहे. या भूमिगत केबलमधून जिवंत विद्युततारा चक्क बाहेर निघाल्या आहेत. मात्र याकडे अद्याप कुणाचेही लक्ष नाही. या धोकादायक जिवंत विद्युत तारांमुळे एखाद्यावेळी अनुचित घटना घडण्याचीही दाट शक्यता आहे.
चंद्रपूर- नागपूर- गडचिरोली राज्य महामार्गावरील मूल शहरातील पंचायत समिती ते बँक आॅफ इंडियापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. १५ कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात येत असलेल्या रस्त्याबरोबरच भूमिगत विद्युत व्यवस्था करायची आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली येत असलेल्या विद्युत विभागाच्या मार्फतीने सदर विद्युतचे काम करण्यात येत आहे. भूमीगत विद्युत पाईप केबलमधून जिवंत विद्युत तारा बाहेर निघाल्याने फार मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे. मात्र संबंधित विद्युत विभाग कुंभकर्णी झोपत असल्याचा आरोप येथील नगरसेवक प्रभाकर भोयर, अनिल संतोषवार यांनी केला आहे.
मूल शहरातील सदर बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विद्युत उपविभाग चंद्रपूर यांच्या मार्फतीने निलेश इलेक्ट्रीकल्स, नागपूर यांना विद्युत विभागाचे काम देण्यात आले. भूमिगत विद्युत केबल टाकून त्याद्वारे विद्युत पुरवठा करण्याची ही योजना आहे. मात्र केबल जमिनीखाली टाकल्यानंतर त्याची योग्यप्रकारे काळजी घेणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. याचा परिणाम असा झाला की केबलमधून ुजिवंत तारा बाहेर आल्या.
यासंदर्भात मूल येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत उपअभियंत्याला पत्राद्वारे विविध त्रुटीबाबत कळविले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. एक कोटी १५ लाख रुपयांचे सदर विद्युत विभागाचे काम आहे. मात्र पैसे खाण्याच्या हव्यासापोटी निकृष्ट दर्जाचे इलेक्ट्रीक खांब तसेच विद्युत केबल टाकले जात असल्याने विद्युत व्यवस्था तकलादू स्वरुपाची होताना दिसत आहे. याचा परिणाम भविष्यात जीवघेणा ठरू शकतो. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Out of the electric cable in the cable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.