वरोऱ्यातील १६१३ कुटुंब शौचालयाविना

By Admin | Updated: March 11, 2016 01:25 IST2016-03-11T01:25:26+5:302016-03-11T01:25:26+5:30

काही वर्षापूर्वी वरोरा नगरपालिकेला दोनदा संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचा पुरस्कार मिळाला होता.

Out of 1613 families in the vicinity without toilets | वरोऱ्यातील १६१३ कुटुंब शौचालयाविना

वरोऱ्यातील १६१३ कुटुंब शौचालयाविना


वरोरा : काही वर्षापूर्वी वरोरा नगरपालिकेला दोनदा संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचा पुरस्कार मिळाला होता. या पुरस्कार प्राप्त पालिका हद्दीत आजही १६१३ कुटुंबाकडे शौचालय नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. या कुटुंबातील सदस्य उघड्यावर शौचास जात असल्याने वरोरा शहर स्वच्छ व सुंदर कसे होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वरोरा नगरपालिका हद्दीत सहा प्रभाग असून २३ वॉर्ड आहेत. वरोरा शहराची लोकसंख्या ४६हजार ५३५ आहे तर कुटुंबाची संख्या १० हजार ३०२ आहे. वरोरा शहरात अनेक ठिकाणी नगर परिषदेने पुरुष व महिलांकरिता सार्वजनिक शौचालये तयार केली आहे. प्रत्येकाने शौचालयाचा वापर करावा, यासोबतच घरी शौचालय बांधून त्याचा उपयोग करण्याकरिता नगरपालिका प्रशासनाच्या वतीने नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. शौचालय बांधण्याकरिता अनुदानही दिले जाते. परंतु यातील अनेक कुटुंब शौचालयाचे अनुदान घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून आले आहे.
शौचालय बांधण्याकरिता नगरपालिका प्रशासनाने व्यापक पावले उचलली असताना आजही वरोरा शहरात १६१३ कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालय नाही, असे आढळून आले आहे. ही बाब शहर सौंदर्याच्या दृष्टीने व आरोग्याच्या दृष्टीने गंभीर आहे. ज्या कुटुंबाकडे शौचालय नाही, अशा कुटुंबियांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अनुदान देवून शौचालय बांधण्याकरिता अर्ज मागितले. त्यात १४५० अर्ज आले.
तपासणीअंती १०५० कुटुंब शौचालय बांधकामास पात्र ठरले. त्यामुळे अद्याप काही कुटुंबांनी शौचालय बांधकाम सुरु केले असले तरी १६३ कुटुंबियाकडे शौचालय राहणार नाही, एवढे मात्र निश्चित मानले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Out of 1613 families in the vicinity without toilets