अनाथ मुलींनी केले ताडोबा भ्रमण
By Admin | Updated: October 12, 2015 01:25 IST2015-10-12T01:25:28+5:302015-10-12T01:25:28+5:30
वसुंधरा चॅरीटेबल ट्रस्ट नागपूर ही संस्था अनाथ मुलींची संगोपन व शैक्षणिक बौद्धीक विकास करणारी संस्था आहे.

अनाथ मुलींनी केले ताडोबा भ्रमण
चंद्रपूर : वसुंधरा चॅरीटेबल ट्रस्ट नागपूर ही संस्था अनाथ मुलींची संगोपन व शैक्षणिक बौद्धीक विकास करणारी संस्था आहे.
विदर्भातील तसेच इतर राज्यातील आई वडीलापासून वंचित मुलींमध्ये उत्साह निर्माण करून त्यांना नवचेतना देण्याच्या तसेच या अनाथ विद्यार्थिनीमध्ये पर्यावरणाविषय जागृती व प्रेम निर्माण करण्याच्या हेतूने सुधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्याने व मतीन शेख अध्यक्ष राजीव गांधी महाविद्यालय चंद्रपूर यांच्या पुढाकाराने शुक्रवारी ताडोबा भ्रमण करण्यात आले.
या भ्रमणकरिता ५० अनाथ विद्यार्थीनी त्यांच्या चॅरीटेबल ट्रस्टच्या विविध पदाधिकाऱ्यासह चंद्रपूर येथे दाखल झाल्या. मतीन शेख यांनी त्या मुलींची राहण्याची व भोजनाची व्यवस्था स्थानिक राजीव गांधी महाविद्यालयात केली. प्रदीप खांडरे यांच्याकडून विद्यार्थिनींना ब्लँकेट व बिस्कीटांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी प्राचार्य डॉ.प्रमोद काटकर, शैलेंद्र बैस, उज्वल धामनगे, विनोद झाडे, प्रदीप खांडरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)