मूल नगराध्यक्षांनी स्वीकारला पदभार

By Admin | Updated: January 1, 2017 01:13 IST2017-01-01T01:13:25+5:302017-01-01T01:13:25+5:30

नगर परिषद मूलच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्राचार्या रत्नमाला भोयर यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार मावळत्या नगराध्यक्षा

The original municipality accepts the charge | मूल नगराध्यक्षांनी स्वीकारला पदभार

मूल नगराध्यक्षांनी स्वीकारला पदभार

उपाध्यक्षपदी नंदकिशोर रणदिवे : स्वीकृत सदस्यपदी अजय गोगुलवार
मूल : नगर परिषद मूलच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्राचार्या रत्नमाला भोयर यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार मावळत्या नगराध्यक्षा रिना थेरकर यांच्याकडून स्वीकारला. नगराध्यक्षा रत्नमाला भोयर यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष व स्विकृत सदस्यपदाचीही निवड झाली. उपाध्यक्षपदी नंदकिशोर रणदिवे तर स्विकृत सदस्यपदी अजय गोगुलवार व चंद्रकांत आष्टनकर हे दोन्ही भाजपाचे अविरोध निवडून आले आहे. नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्षासह १७ पैकी १६ सदस्य निवडून आल्याने स्पष्ट बहुमत भाजपाला मिळाले होते हे विशेष!
नगराध्यक्षपदाची सुत्रे नगराध्यक्षा रत्नमाला भोयर यांनी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या उपस्थित स्वीकारली. मूल नगराचा सर्वांगीण विकास करण्यास कटिबद्ध असून राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात मूल शहराचा चेहरामोहरा बदलविण्याचा संकल्प केला आहे, असे मत ‘लोकमत’शी बोलताना भोयर यांनी व्यक्त केले. निवडणुकीदरम्यान भाजपाने दिलेल्या वचननाम्याची टप्प्या-टप्प्याने पुर्तता करण्याचा आपला प्रयत्न राहणार असून मूल शहराच्या विकासासाठी नियोजनबद्ध आखणी केली जाणार आहे. मूल शहर हागणदारीमुक्त करण्यासोबतच पिण्याच्या पाण्याची सुविधा, विजेची सुविधा, नालीची नियमित सफाई, ओपन स्पेस जागेत बगीचा व सौंदर्यीकरणावर भर, महिलांना व युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, अतिक्रमणधारकांना स्थायी पट्टे, तसेच जे वचननाम्यात देण्यात आले आहे, त्याची पूर्तता करण्यास कटीबद्ध असल्याचे मत व्यक्त केले. नगर परिषद मूलच्या उपाध्यक्षपदी नंदकिशोर रणदिवे व स्विकृत सदस्यपदी अजय गोगुलवार व चंद्रकांत आष्टनकर यांची निवड झाल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यात उत्साह संचारला. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशाने झालेल्या या निवडणुकीमुळे व भाजपाचे स्पष्ट बहुमत असल्याने सर्व शांततेत पार पडले. यावेळी भाजपाचे राम लखिया, शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर, चंदू मारगोनवार, नगरसेवक विनोद सिडाम, प्रशांत समर्थ, अनिल साखरकर, प्रशांत लाडवे, करकाडे, मिलिंद खोब्रागडे, रेखा येरणे, शांताबाई मांदाडे, वनमाला कोडापे, विद्या बोबाटे, आशा गुप्ता आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी;

Web Title: The original municipality accepts the charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.