पर्यावरण शिक्षण शिबिराचे आयोजन
By Admin | Updated: October 16, 2015 01:37 IST2015-10-16T01:37:29+5:302015-10-16T01:37:29+5:30
ब्रह्मपुरी वनविभाग ब्रह्मपुरी व तरुण पर्यावरणवादी मंडळ शंकरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सिंदेवाही, तळोधी, नागभीड, उत्तर व दक्षिण ब्रह्मपुरी व चिमूर...

पर्यावरण शिक्षण शिबिराचे आयोजन
अनुकरणीय उपक्रम : विविध विषयांवर मार्गदर्शन
शंकरपूर : ब्रह्मपुरी वनविभाग ब्रह्मपुरी व तरुण पर्यावरणवादी मंडळ शंकरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सिंदेवाही, तळोधी, नागभीड, उत्तर व दक्षिण ब्रह्मपुरी व चिमूर येथे एक दिवसीय पर्यावरण शिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सिंदेवाही वनविभागांतर्गत सिंदबोडी, येथील पर्यावरण शिक्षण शिबिराचे उद्घाटन सहाय्यक वनसंरक्षक मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरामध्ये वनस्पतीची ओळख व महत्त्व या विषयावर सुर्यकांत खोब्रागडे, वन्यप्राणी यांची विष्ठा, पाऊलखुणा या विषयावर अमोद गौरकर, पर्यावरण काळाची गरज या विषयावर अवार्ड संस्थेचे गुणवंत वैद्य, साप-श्रद्धा व अंधश्रद्धा, यावर मूल येथील सर्पमित्र उमेशसिंह झिरे, वनपरिक्षेत्राधिकारी कामडे यांनी मार्गदर्शन केले. तळोधी वनविभागाअंतर्गत पेरजागड येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले तर नागभीड वनविभागाअंतर्गत घोडाझरी, ब्रह्मपुरी वनविभागाअंतर्गत एकारा (भुज) चिमूर वनविभागाअंतर्गत मुक्ताई येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विद्यार्थ्यांना वनस्पतीची ओळख व महत्त्व, वण्यप्राणी पाऊलखुणा व विष्ठा, पर्यावरणाचा समतोल राखणे, मानव व वन्यजीव संघर्ष, साप श्रद्धा व अंधश्रद्धा या विषयावर येथील सुर्यभान खोब्रागडे, अवार्ड संस्थेचे गुणवंत व तरुण पर्यावरणवादी मंडळाचे अमोद गौरकर, विरेंद्र हिंगे, झेप निसर्ग संस्थेचे पवन नागरे, अमित देशमुख, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, सहायक वनसंरक्षक मेश्राम, पंधरे, वनपरिक्षेत्राधिकारी आक्केवार, कामडी, पठाण, विजय गजभे आदींनी मार्गदशन केले. (वार्ताहर)