जिल्ह्यात ३२४ शेतकरी शेतीशाळेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:20 IST2021-07-10T04:20:18+5:302021-07-10T04:20:18+5:30
तर ६५ महिला शेतकऱ्यांच्या शेतीशाळांचा समावेश आहे. या शेतीशाळांमध्ये जिल्ह्यातील ९ हजार ७२० शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. शेतीशाळेमध्ये ...

जिल्ह्यात ३२४ शेतकरी शेतीशाळेचे आयोजन
तर ६५ महिला शेतकऱ्यांच्या शेतीशाळांचा समावेश आहे. या शेतीशाळांमध्ये जिल्ह्यातील ९ हजार ७२० शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.
शेतीशाळेमध्ये सोयाबीन, कापूस, भात, तूर व हरभरा या पिकांचे पेरणीपूर्व ते काढणीपश्चात तंत्रज्ञानाबाबत वर्गनिहाय मार्गदर्शन केले जाते. या वर्गाची सुरुवात १५ मेपासून करण्यात आली आहे.
बाॅक्स
शेतीशाळेमधील उपक्रम
गट पीक प्रात्यक्षिक, आंतरपीक प्रात्यक्षिक, महिला शेतीशाळा, एक गाव एक वाण, जमिनीची आरोग्यपत्रिका, पीक स्पर्धा, बिजोत्पादन, पीक संग्रहालय, रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन, बीबीएफ लागवड तंत्रज्ञान, खत व्यवस्थापन, तालुक्यातील दोन प्रमुख पिकांमध्ये उच्चतम उत्पादन घेणारे दोन शेतकरी व त्यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाची माहिती शेतीशाळेमध्ये देण्यात येत आहे.
शेतीशाळा हे शेतकऱ्यांमध्ये तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रभावी माध्यम असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेतीशाळेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.