राजुरा येथे सखी महोत्सवाचे आयोजन
By Admin | Updated: December 31, 2015 00:56 IST2015-12-31T00:56:27+5:302015-12-31T00:56:27+5:30
लोकमत सखी मंच राजुराद्वारा आयोजित राजुरा, कोरपना, गडचांदूर आणि बल्लारपूर येथील हजारो सखींचा महोत्सव

राजुरा येथे सखी महोत्सवाचे आयोजन
लावणीची धूम : मिर्झा एक्स्प्रेसचेही आयोजन
राजुरा : लोकमत सखी मंच राजुराद्वारा आयोजित राजुरा, कोरपना, गडचांदूर आणि बल्लारपूर येथील हजारो सखींचा महोत्सव राजुरा येथील शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात १ जानेवारी २०१६ ला सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या महोत्सवाचे विशेष आकर्षण डीआयडी सुपर मॉम फेम शिवाणी सावदेकर यांचा बहरदार लावणी धमाका असणार आहे. या महोत्सवाचे उदघाटन आमदार अॅड. संजय धोटे यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार प्रभाकर मामूलकर, अॅड. वामनराव चटप, सुभाष धोटे, सुदर्शन निमकर, नगराध्यक्ष मंगला आत्राम उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवात स्वयंस्फूर्त भाषण स्पर्धासाठी स्मिता येरावार ८६२४०८१८०७, सुप्रिया पोशट्टीवार ९४२१८१३४३६,फॅन्सी ड्रेस स्पर्धा शुभांगी वाटेकर- ८९७५८५०६६०, शिला बेलखेडे- ९९२३०४४२७४, फॅशन शो सुनिता वलने- ९०११३२४८१४, मालु राऊत- ९९२१०३४८९६, डम शो कृतिका सोनटक्के- ९९२२९३०१५१, ज्योती जावरे- ९४०५२७६०३८, समूहनृत्य स्पर्धा- प्रा. सुनिता जमदाडे- ९८५००८०९५०, विमल खान- ७३८५५९१९६८, एकल नृत्य स्पर्धा- उषा बोबडे- ९६७३८०२३०५, नैना गेडाम- ८२७५२१५३७१ अशा विविध स्पर्धाचे आयोजन होत आहे.
२ जानेवारी २०१६ ला रात्री ७ वाजता हास्यसम्राट डॉ. मिर्झा बेग यांच्या मिर्झा एक्स्प्रेसचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उदघाटन पर्यविक्षाधिन पोलीस उपअधीक्षक सुशिलकुमार नाईक यांच्या हस्ते होईल.
अध्यक्षस्थानी तहसीलदार धर्मेश फुसाटे राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी राजरत्न बन्सोड, ठाणेदार प्रमोद डोंगरे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल हजारे, अशोक मेडपल्लीवार उपस्थित राहतील.
या कार्यक्रमासाठी सखी मंचच्या सदस्याना सहपरिवार मोफत प्रवेश असून इतर व्यक्तीसाठी प्रवेशपत्र आवश्यक आहे.
३ जानेवारी २०१६ ला रात्री ७ वाजता आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन राजुराचे माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, शिवसेना तालुका प्रमुख नितीन पिपरे व सतिश धोटे यांच्या हस्ते होईल. स्टॉल प्रवेशाकरिता छोटूलाल सोमलकर ९४२१७२३२३७, अविनाश दोरखंडे ९२२६७५३२३२, सादिक काझी ९९६०४०६६९०, विजय चन्ने- ८४२१६२६७६७ यांच्याशी संपर्क साधता येईल.