जैविक शेती शेतकऱ्यांसाठी लाभदायक
By Admin | Updated: June 19, 2015 01:52 IST2015-06-19T01:52:08+5:302015-06-19T01:52:08+5:30
सद्यस्थितीत शेतकरी हा योग्य माहितीअभावी गैरसमजुतीमुळे रासायनिक शेतीकडे जास्त आकर्षित होत आहे.

जैविक शेती शेतकऱ्यांसाठी लाभदायक
चंदनखेडा: सद्यस्थितीत शेतकरी हा योग्य माहितीअभावी गैरसमजुतीमुळे रासायनिक शेतीकडे जास्त आकर्षित होत आहे. मात्र भविष्यात आपली शेती योग्य पद्धतीने टिकवून ठेवण्यासाठी जैविक शेतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. जैविक शेती ही शेतकऱ्यांसाठी लाभदायक असून त्यातून शेतकरी आपले अधिकाधिक उत्पादन घेवून अपाली आर्थिक प्रगती साधू शकतो. व शेतजमिनीची प्रतही टिकवून ठेवू शकतो. त्यामुळे ही शेती काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जैविक शेती केंद्राचे क्षेत्रीय शास्त्रज्ञ डॉ. व्ही. वाय. देवघरे यांनी केले.
संसद आदर्श ग्राम चंदनखेडा येथे जैविक शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. केंद्र शासनाच्या जैविक शेती केंद्राच्या वतीने आयोजित या एक दिवसीय कार्यशाळेत सेंद्रीय शेती, कीड नियंत्रण, खत प्रमाणीकरणाची पद्धत, खतांचे नियोजन आदी विषयांवर शेतकऱ्यांना जैविक शेतीची उपयुक्तताबाबत डॉ. देवघरे व चमूद्वारा विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. सोबतच सहभागी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली. या कार्यशाळेत गावातील अनेक शेतकरी बांधवांनी उपस्थिती दर्शविली. (वार्ताहर)